परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांचा हत्येचा कट, ठार मारण्यासाठी देण्यात आली दोन कोटी रुपयांची सुपारी
त्याचप्रमाणे परभणीमधील एका बड्या व्यक्तीकडूनच ही सुपारी देण्यात आली असल्याचे संजय जाधव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
राजकीय नेते मंडळी, सेलिब्रिटीसारख्या दिग्गज व्यक्तींना ठार करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याच्या घटना अनेकदा कानावर येतच असतात. त्यात आता परभणीहून (Parbhani) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यांना ठार मारण्यासाठी तब्बल 2 कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. संजय जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, नांदेड येथील रिंदा गँगला त्यांची हत्या करण्यासाठी ही सुपारी देण्याचे आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी नानलपेठ (Nanalpeth) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे जाधवांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे परभणीमधील एका बड्या व्यक्तीकडूनच ही सुपारी देण्यात आली असल्याचे संजय जाधव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. Shiv Sena on BJP Over Hindutva : हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही; शिवसेनेचा भाजपला टोला
या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरीही याबाबत पोलिसांकडून चौकशी नेमण्यता आली असून संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच याबाबत गुन्हा दाखल केला जाणार असे पोलिसांनी म्हणणे आहे.
नेमकं हे काय प्रकरण आहे याबाबत छडा लावणार झाला आहे. दरम्यान रविवारी झालेल्या दस-या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरोधकांवर खरपूस टिका केली. त्यात भाजप नेते नारायण राणेचा (Narayan Rane) उल्लेख बेडूक आणि त्यांची दोन पिल्ले असा केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे उघडले जात नाहीत म्हणून आम्हाला हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारणारे हे बाबरी पाडली होती तेव्हा शेपट्या घालून बसले होते असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.