परभणी: रोशनखान भागात 18 लाखांचा गुटखा जप्त, तीन जणांना अटक

परभणी शहरातील रोशनखान मोहल्ला भागात स्थानिक गुन्हा शाखा आणि अन्न औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत 18 लाख 30 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

CRIME | (Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

परभणी (Parbhani) शहरातील रोशनखान मोहल्ला भागात स्थानिक गुन्हा शाखा आणि अन्न औषध प्रशासनाने केलेल्या  कारवाईत 18 लाख 30 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

शहरातील रोशनखान मोहल्ला भागात एका गोदामात गुटख्याचासाठा करुन ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली सूत्रांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले. तर पाच तासांच्या या कारवाईनंतर पोलिसांनी छापे मारत 18 लाख 30 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. 

या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अातापर्यंत तिघांना अटक केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने दिली आहे. लाखो रुपयांचा परभणीत गुटख्याचा साठा जप्त केल्याने गुटखा विक्रेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement