परळी: अवैध गर्भपात प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय, डॉक्टर सुदाम मुंडे, सरस्वती मुंडे यांना 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
परळी अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टर मुंडे दांम्पत्यासह मृत महिलेचा पती महादेव पटेकर यांनाही 10 वर्षांची शिक्षा
Parali Illegal Female Fetus Abortion Case: सात वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हादरवणार्या परळी येथील स्त्रीभ्रुण हत्या प्रकारणी (Illegal Female Foetus Abortion) आज न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. याप्रकरणामध्ये डॉ. सुदाम मुंडे (Dr. Sudam Munde)आणि डॉ. सरस्वती मुंडे (Dr. Saraswati Munde) या जोडप्याला 10 वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सोबतच 50 हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. मुंडे दांमप्त्यासोबत महादेव पटेकर यांनाही 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर इतर 14 आरोपी निर्दोष सोडण्यात आले आहेत. महाराष्ट्रात बोगस डॉक्टरांचं नवं रॅकेट उघड! मागील 4 वर्ष सुमारे 57 जण करत आहेत 'डॉक्टर' म्हणून काम
बीड येथील परळीमध्ये 2012 साली मुंडे डॉक्टर दांम्पत्यांनी बेकायदेशीरपणे गर्भपात केले होते. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये विजया पट्टेकर यांचा मृत्यू झाला होता. महादेव पटेकर हे विजया यांचे पती आहेत. गर्भपातादरम्यान मृत्यूमुळे मुंडे हॉस्पिटल चर्चेमध्ये आले आणि या रूग्णालयात बेकायदेशीरपणे गर्भपात होत असल्याचं, स्त्रीभ्रुण हत्या होत असल्याची अनेक प्रकरण बाहेर पडली.
मुंडे दांपत्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेले गैर व्यवहार समोर आल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने मुंडे दाम्पत्यांचा प्रॅक्टिस करण्याचा परवान 5 वर्षासाठी रद्द केला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी या दोघंनी अनेक प्रयत्न केले मात्र काही दिवसातच ते पोलिसांना शरण आले. सुदाम मुंडे नाशिक कारागृहात आहेत तर त्यांच्या पत्नी जामिनावर बाहेर पडल्या आहेत.