Pankaja Munde on Racism: 'मोदीजीही मला संपवू शकत नाहीत', पंकजा मुंडे यांचे वंशवादावर वक्तव्य
राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना वंशवाद संपवायचा आहे. मी देखील वंशवादातूनच राजकारणात येते. परंतू, जर मी जनतेच्या मनात असेल तर मोदीही मला संपवू शकत नाहीत, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) त्यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना वंशवाद संपवायचा आहे. मी देखील वंशवादातूनच राजकारणात येते. परंतू, जर मी जनतेच्या मनात असेल तर मोदीही मला संपवू शकत नाहीत, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वढदिवसानिमित्त भाजपने सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित "बुद्धिजिवी लोकांसोबत संवाद" या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भाषणाच्या ओघात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, जर जनतेच्या मनात असेल तर मोदीजीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत. विरोधी पक्षात, काँग्रेसमध्ये वंशवादाचे राजकारण सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादच संपवायचा आहे. दरम्यान, हे विधान करताना पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषण थोडे थांबवले (पॉझ घेतला). त्यानंत त्या म्हणाल्या मी देखील वंशवादाचेच प्रतिक आहे. पण, तुमच्या (जनतेच्या) मनात असेल तर मला कोणीही संपवू शकत नाही. मोदीजी देखील माझे राजकारण संपवू शकत नाहीत. (हेही वाचा, Maharashtra Politics: माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्री पद दिलं नाही, पंकजा मुंडेंचा खोचक टोला)
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. उलटसुलट प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीरवार यांनी या विधानाबाबत एबीपी माझा या खासगी वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले की, पंकजा मुंडे या वंश वादासंदर्भात बोलत होत्या. त्यांच्या विधानातून पंतप्रधान मोदी यांच्याबाबत काही बोलल्याचे दिसत नाही. तरीही त्यांच्या विधानाची माहिती घेऊन अधिक बोलता येऊ शकेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना म्हटले की, पंकजा मुंडे यांचे विधान मी ऐकले. परंतू, त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय हे समजू शकत नाही. त्या असं बोलल्या आहेत याचा अर्थ त्यांना काहीतरी सांगायचे नक्कीच असेल. पण, ते नेमके काय आहे हे आताच सांगता येत नसल्याचेही खडसे म्हणाले.