निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना मिळाला आणखी एक दणका; पीएफ कार्यालयाने दिले आहेत 'हे' आदेश

पण त्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या दीड वर्षांपासून कारखान्यातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ देण्यात आलेला नाही.

पंकजा मुंडे (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकज मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. पण त्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या दीड वर्षांपासून कारखान्यातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ देण्यात आलेला नाही. म्हणूनच शासनाच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने रखडलेल्या पीएफ मधील किमान अर्धी रक्कम 24 तासांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात भरण्याचे आदेश दिले आहेत.

कारखान्यातील प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफची रक्कम कपात केली होती परंतु ती कर्मचाऱ्यांच्या खात्यात भारण्यातच आली नव्हती. म्हणून कारखान्यातील कर्मचारी राठोड यांनी पीएफ कमिशनर यांच्याकडे तक्रार केली असता, 30 ऑक्टोबर रोजी त्यांनी कारखाना प्रशासनाला 24 तासांच्या आत अर्धी रक्कम भरण्याचा आदेश दिला. एकूण पीएफची रक्कम 2 कोटी 94 लाख इतकी आहे.

पंकजा मुंडे यांनी शासनाला विनंती करत 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितली होती. परंतु पीएफ कमिशनर यांनी 30 ऑक्टोबर रोजी 24 तासात अर्धी रक्कम भरल्यास पुढील मुदतवाढीविषयी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Pankaja Munde यांच्या पराभवाची कारणे नेमकी काय... वाचा सविस्तर

कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबांनी वेतन आणि पीएफ न मिळाल्याने उपोषण केले होते. परंतु त्याची दाखल कारखाना प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. शेवटी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपोषणार्थींना भेटून पीएफ कार्यालयाकडे तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन केले.