IPL Auction 2025 Live

Pankaja Munde at Gopinath Gad: 'मिळायचा त्यांना इशारा मिळतोच, सर्वांना बोलावून भूमिका घेईन- पंकजा मुंडे

माझ्याही खांद्यावर बंदूक ठेऊन कोणाला लढू देत नाही. माझी स्वतंत्र ठाम भूमिका असते. आपल्याला कोणाला इशारा द्यायचा नाही. ज्यांना इशारा मिळायचा असतो तो मिळतोच. जर काही भूमिका घ्यायची असेल ती सर्वांना बोलावून घेईन.

Pankaja Munde | (Photo Credits: Facebook)

Parli Gopinath Gad: आपण कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढत नाही. माझ्याही खांद्यावर बंदूक ठेऊन कोणाला लढू देत नाही. माझी स्वतंत्र ठाम भूमिका असते. आपल्याला कोणाला इशारा द्यायचा नाही. ज्यांना इशारा मिळायचा असतो तो मिळतोच. जर काही भूमिका घ्यायची असेल ती सर्वांना बोलावून घेईन. जे काही सांगायचे ते स्पष्टपणेच सांगेन, असे म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच, विरोधकांनाही इशारा दिला. पंकजा मुंडे यांनी आजच्या भाषणातून पक्षांतर्गत विरोधकांनाच इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजप नेते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांचा आज नववा स्मृतीदिन गोपीनाथ गड येथे पार पडला. या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या.

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपण छोट्या लोकांचा विचार करत नाही. आपण त्यांना काही मागणारही नाही. छोट्या लोकांकडे काय मागणार? आपले नेते अमित शाह हेच आहेत. आपण एकदा त्यांना भेटणार आहोत. त्यांना भेटून आपली भूमिका मांडणार असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, आपले राजकारण हे कोणाला काही मागण्यासाठी नाही. आपले राजकारण हे लोकांसाठी आहे. मला कधीही माझ्याकाठी काही नको आहे. जे काही हवे ते माझ्या सामान्य लोकांसाठी हवे आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी हवे आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. (हेही वाचा, Pankaja Munde on BJP & Mahadev Jankar: पंकजा मुंडे यांचं नेमकं चाललंय काय? भाजप सोडणार? सूचक विधानामुळे महादेव जानकर यांचा 'रासप' चर्चेत)

व्हिडिओ

पंकजा मुंडे यांनी सांगितले की, संघर्ष माझ्यासाठी नवा नाही. माझ्या बापाने संघर्ष केला. तो संघर्ष खूप वेगळ्या पातळीवरचा होता. माझा बाप वादळासाराखा जगला. त्याचीच मी लेक आहे. त्यामुळे आपण संकट आणि संघर्षाला घाबरत नाही. माझ्या बापापेक्षा माझ्यासाठी कोणीच मोठे नाही. त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसारच मी पुढे निघाली आहे. आजही मला असे वाटते की, माझ्या बाजूच्या डाव्या हाताला) कमळात गोपीनाथ मुंडे बसले आहेत. फक्ता माझ्यासाठी ते बाबा होते. पण मी जेव्हा लांकामध्ये असते तेव्हा ते माझ्यासाठी साहेब असतात, असे भाऊक उद्गारही पंकजा मुंडे यांनी या वेळी काढले.