Pankaja Munde Dasara Melava 2023: माझा आवाज कोणीच दाबू शकत नाही; पंकजा मुंडे यांचा दसरा मेळाव्यातून इशारा

आज महाराष्ट्रात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. आज मराठा आरक्षण, ओबीसींचे प्रश्न, ऊसतोड कामगारांच्या समस्या असे विविध प्रश्न असताना लोकांच्या आपेक्षा सरकारकडून वाढल्या आहेत. मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा वेळी आपण स्वस्त बसू राहणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.

Pankaja Munde, Sawargaon | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Pankaja Munde Speech Dasara Melava 2023 At Sawargaon: कारखान्याला नोटीस आली तर दोन दिवसांमध्ये 11 कोटी रुपयांचा निधी जामा करुन देणारे आणि तसे धनादेश जमा करणारे लोक आपण आहात. तुमच्या जोरावच माझे राजकारण सुरु आहे. एखादी निवडणूक मी हरले म्हणून जनतेच्या नजरेतून हारले असे नाही. शिवशक्ती परिक्रमेमध्ये मला हे चांगले समजले. या परिक्रमेमध्ये मला पहिल्यांदा समजले महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक माझ्यावर किती प्रेम करतात. ही सगळी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची कृपा आहे. म्हणूच मी माझ्या लोकांसाठी लढत राहील, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही. आज महाराष्ट्रात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. आज मराठा आरक्षण, ओबीसींचे प्रश्न, ऊसतोड कामगारांच्या समस्या असे विविध प्रश्न असताना लोकांच्या आपेक्षा सरकारकडून वाढल्या आहेत. मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा वेळी आपण स्वस्त बसू राहणार नाही. राज्यातील अनेक प्रश्न गंभीर आहेत. अशा वेळी आज लोकांना देण्यासाठी माझ्याकडे काय आहे? आज माझ्याकडे कोणतेही पक्ष नाही. मी एखाद्या ग्रामपंचायतीचा सदस्यही नाही. असे असताना मी लोकांना काय देऊ शकते? याचे कारण एकच. ते म्हणजे मी फक्त लोकांना स्वाभीमान देऊ शकते, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

लोक सांगतात पंकजा मुंडे पक्ष सोडणार. त्यांचं असं चाललंय तसं चाललंय... बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. पण लक्षात ठेवा. स्वार्थासाठी पक्ष सोडेल इतकी पंकजा मुंडे यांची निष्ठा लेचीपेची नाही. जोवर तुमचे प्रेम आहे तोवर मला कोणाचीच भीती नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. मी राजकारणात आहे ती म्हणजे माझ्या लोकांसाठी. तुम्ही सगळे माझे आहात. माझ्या लोकांना न्याय देणे हे माझे कामच आहे, असेही त्या म्हणाल्या.

व्हिडिओ

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगाव येथे पार पडतो आहे. या मेळाव्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मुंडे समर्थक दाखल झाले होते. या वेळी बोलताना त्या काहीशा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपमध्ये नेतृत्वाकडून डावलली जाणारी संधी आणि राज्यातील नेतृत्वाकडून होणारी कोंडी पाहता, त्यांनी आता काही वेगळा निर्णय घ्यावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे एका बाजूला कार्यकर्त्यांच्या भावनेचा रेटा दुसऱ्या बाजूला पक्षनिष्ठा अशा विचित्र कात्रीत सापडलेल्या पंकजा मुंडे काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.