Pune Crime: पुण्यात खवले मांजर तस्करी प्रकरणात 7 जणांना वन कोठडी

जगात वाघाच्या खालोखाल सर्वात जास्त तस्करी खवल्या मांजराची होते.

Arrest | (Representative Image)

पुणे जिल्ह्यात जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ  (Pune rural area Forest) घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव येथे खवले मांजर (Pangolin) या शेड्युल 1 मधील  वन्यप्राण्याची तस्करी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी 6 आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. जगात वाघाच्या खालोखाल सर्वात जास्त तस्करी खवल्या मांजराची होते. खवले मांजर हा प्राणी वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत अनुसूची 1 मध्ये येतो. (हेही वाचा - Pune Crime: 'फर्जीचा' प्रभाव! बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक, पुण्यातील हिंजवडीतील घटना)

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रोहीदास पंढरीनाथ कुळेकर वय 55 वर्ष, कांताराम सखाराम वाजे वय 49 वर्ष दोघे रा. भोमाळे, सखाराम बबन मराडे वय 43 वर्ष, सागर पुनाजी मेमाणे वय 31 वर्ष, रा. तळेराण, जालिंदर कान्डु कशाळे वय 65 वर्ष, रा. बडेश्वर (ता. मावळ), श्रीमती गीता नंदकुमार जगदाळे रा. चव्हाणवस्ती कुमठे (ता. कोरेगाव जि. सातारा), शांताराम सोमनाथ कुडेकर वय 32 वर्ष, रा. करंजाळे (ता. जुन्नर) असे एकूण 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा तथा सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर संदेश पाटील, घोडेगाव आणि खेड वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आली.