Pandharpur Wari Palkhi Marg Inauguration: वारीच्या भक्तीमार्गाने देशाची वाटचाल सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंढरपूर वारी (Pandharpur Wari) ही जगातील एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे वारी मार्ग तयार होतो आहे ही मोठी गोष्ट आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काढले आहेत.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

वारीच्या भक्तीमार्गाने देशाची वाटचाल सुरु आहे. पंढरपूर वारी (Pandharpur Wari) ही जगातील एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे वारी मार्ग तयार होतो आहे ही मोठी गोष्ट आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काढले आहेत. पंढरपूर वारी पालखी मार्गाचा शुभारंभ (Pandharpur Wari Palkhi Marg Inauguration) आज (11 नोव्हेंबर) ऑनलाईन पद्धतीने पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी कार्यक्रमात बोलताना वारीबाबतचे आपले अनुभव कथन केले. छायाचित्रकार म्हणून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून काढलेल्या वारीच्या फोटोवेळी आलेला अनुभवही उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितला. वारकरी सांप्रदाय हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या वाटचालीत पालखी मार्ग आणि पंढरपूर वारीचे विशेष महत्त्व आहे. देश वारीच्या भक्तीमार्गानेच पुढे जात असल्याचे उद्गारही त्यांनी या वेळी काढले. पंढरपूर वारीबाबत महाराष्ट्रतील घराघरात भक्तीमय नाते आहे. एखाद्या व्यक्तीस वारीला जाता नाही आले तरी जो व्यक्ती वारीला जाऊन आला आहे. त्या व्यक्तीस चरणस्पर्ष करुन आशीर्वाद घेतो. म्हणजेच जो वारी करुन आला आहे त्यालाच हा भक्त विठुमाऊलीच्या रुपात पाहतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील पालखी मार्गाबाबत विस्ताराने माहिती सांगीतली. या वेळी त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने राबिलेल्या विविध उपक्रमांचीही माहिती दिली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif