Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीला पंढरपूरचा पांडूरंग धावला: विठ्ठल मंदिराकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटी रुपयांची मदत

Coronavirus: राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आता चक्क पंढरपूरच्या पांडूरंगाने धाव घेतीली आहे. विठ्ठल मंदिराकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

Vitthal Rukmini Mandir | Photo Credits: Instagram

Coronavirus: राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आता चक्क पंढरपूरच्या (Pandharpur) पांडूरंगाने धाव घेतीली आहे. विठ्ठल मंदिराकडून  (Vitthal Mandir) मुख्यमंत्री सहाय्यता निधीस (CM Relief Fund 1) कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

देशापुढे कोरोनाचं मोठं संकट उभं आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कोरोना विरोधातील लढ्यासाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर देशातील तसेच राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी आणि मोठं-मोठ्या उद्योजकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. (हेही वाचा - Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल, खासदार सुरेश अंगडी 'पंतप्रधान केअर फंड'ला एक महिन्याचा पगार देणार)

दरम्यान, आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. मंदिर समितीशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विविध संस्था तसेच मंदिरांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. शिर्डी येथील साई मंदिरांने 51 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व मंदिरं बंद करण्यात आली आहेत. यात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचाही समावेश आहे. कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार प्रयत्न करत आहे. ही लढाई जिंकण्यासाठी सरकारला आर्थिक निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नव्या खात्याती निर्मिती केली आहे. या खात्यात कोणीही आपल्या इच्छेनुसार, आर्थिक मदत देऊ शकतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement