Pandharpur by-Election 2021: भाजपला धक्का, कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर; पंढरपूर विधानसभा मतदारसंघात चुरस वाढली

यात कल्याण काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर भाजपला धक्का बसू शकतो. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत.

Kalyanrao Kale | (Photo Credits-Facebook)

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिडणुकीत (Pandharpur by-Election 2021) भारतीय जनता पक्षाला (BJP) जोरदार धक्का बसण्याची चिन्हे आहेत. भाजपचे कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वाटेवर आहेत. कल्याण काळे हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. मात्र, मधल्या काळात लोकसभा निवडणूक 2019 दरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला धक्का बसला. तर भाजप उमेदवार निवडूण आला. आता आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. यात कल्याण काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर भाजपला धक्का बसू शकतो. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत.

कल्याण काळे आणि भाजप यांच्यातील दुरावा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतची त्यांची जवळीक गेल्या काही काळापासून अधिकच वाढली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या मंचावर कल्याण काळे यांची प्रतिमा असलेला बोर्ड झळकला होता.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) तर भाजप कडून समाधान अवताडे (Samadhan Awatade) रिंगणात आहेत. दरम्यान, मतविभागणी टाळण्यासाठी भाजपने पक्षांतर्गत दोन्ही गट एकत्र करुन उमेदवार दिला आहे. त्यामुळे भाजपचे पारडे जड झाल्याची चिन्हे होती. मात्र, राष्ट्रवादीने ऐनवेळी हादरा देत कल्याणराव काळे यांना आपल्याकडे खेचल्याचे चित्र आहे. (हेही वाचा, Pandharpur by-Election 2021: बंड भोवले, शैला गोडसे यांचे शिवसेनेतून निलंबन; पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत बंडखोरांनी थोपटले दंड, 38 उमेरवारांचे अर्ज दाखल)

दरम्यान, कल्याणराव काळे यांच्यासोबत स्नेहभोजन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काळे यांच्या फार्महाऊसवर जाणार असल्याचे समजते. कल्याणराव केळे हे सोपापूर जिल्ह्यातील एक दमदार प्रस्थ आहे. त्यांचा सोलापूर, मंगळवेढा, आणि इतरही काही तालुक्यांमध्ये मोठा प्रभाव आहे.त्यामुळे काळे यांनी खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास भाजप अडचणीत येऊ शकतो.