Palghar: काळ्या जादूच्या बहाण्याने पालघर येथील महिलेवर पतीच्या मित्रांकडून वारंवार बलात्कार; 5 जणांना अटक
जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या तलासरी येथील महिलेने 11 सप्टेंबर रोजी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने रवींद्र भाटे, दिलीप गायकवाड, गौरव साळवी, महेंद्र कुमावत आणि गणेश कदम यांना या गुन्ह्यात अटक केली.
Palghar: पालघर जिल्ह्यांत एका 35 वर्षीय महिलेवर तिच्या घरातील वास्तू चुका आणि काळ्या जादूद्वारे इतर वाईट जादू दूर करण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या पाच व्यक्तींना अटक करण्यात आली आहे ते पीडितेच्या पतीचे मित्र आहेत. त्यांनी पिडितेला सांगितले की तिच्या पतीवर वाईट जादू टाकण्यात आली आहे. शांतता परत मिळवण्यासाठी तिला काही विधींचा भाग बनवावे लागेल.
आरोपींनी एप्रिल 2018 पासून पीडितेच्या घरी वारंवार येण्यास सुरुवात केली. पीडिता एकटी असताना ते तिच्याकडून विधी करत असतं. ते तिला 'पंचामृत' नावाचे पेय द्यायचे आणि तिच्यावर बलात्कार करायचे. शांतता, समृद्धी आणि तिच्या पतीला स्थिर सरकारी नोकरी मिळू शकेल, असे सांगून आरोपीने तिच्याकडून सोने आणि पैसे घेतले. तिच्यावर 2019 मध्ये ठाण्यातील येऊर जंगलात बलात्कार झाला. त्यानंतर कांदिवलीतील मुख्य आरोपीच्या मठात आणि लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये पीडितेवर बलात्कार करण्यात आला. त्यांनी तिच्याकडून 2.10 लाख रुपये आणि सोने घेतले. (हेही वाचा - Mumbai: धक्कादायक! 26 वर्षीय तरुणीने बुलेटवर केली वांद्रे वरळी सी लिंकमध्ये एन्ट्री; पोलिसांना दाखवली बंदूक, महिलेला अटक)
जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या तलासरी येथील महिलेने 11 सप्टेंबर रोजी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने रवींद्र भाटे, दिलीप गायकवाड, गौरव साळवी, महेंद्र कुमावत आणि गणेश कदम यांना या गुन्ह्यात अटक केली. तलासरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय मुतडक म्हणाले, पाच आरोपींनी हीच पद्धत इतरांवरही वापरली आहे का, हे आम्ही शोधत आहोत.
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या पाच जणांवर भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) 376(2)(एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा) 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय इतर अमानवी, वाईट आणि अघोरी प्रथा आणि काळी जादू कायदा 2013 अंतर्गत देखील आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.