Palghar Shocker: घरगुती भांडणातून पत्नीची हत्या; हॉस्पिटल मध्ये आत्महत्या केल्याचा बनाव रचणारा आरोपी पती अटकेत
पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली त्यामध्ये आरोपी पती कनिश्कने आपला गुन्हा कबूल केला आहे.
घरगुती वादामधून 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या 32 वर्षीय पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पालघर (Palghar) मधील ही घटना धक्कादायक आहे. पत्नीच्या हत्येनंतर तिने आत्महत्या (Suicide) केल्याचा दावा करत पतीने तिचा मृतदेह हॉस्पिटल मध्ये नेला होता मात्र हा प्रकार आत्महत्येचा नसून हत्येचा असल्याचं प्रकाशझोकात आले आहे. या मध्ये आरोपी पती कनिश्क सुरेंद्र पाटील याला अटक करण्यात आली आहे.
Hindustan Times च्या रिपोर्टनुसार, आरोपीची 2 मार्च शनिवार च्या रात्री पत्नीसोबत बाचाबाची झाली. त्यांच्या भांडणामध्ये पतीने पत्नीची हत्या केली. पोलिसांचा अंदाज आहे ही हत्या मध्यरात्री 2 ते 5 दरम्यान झाली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पाटीलने त्याच्या सासरच्या मंडळींना पत्नी कृताली बेशुद्ध झाल्याचं कळवलं. त्यानंतर त्याने मृतावस्थेत असलेल्या पत्नीला बोईसर येथील सरकारी रूग्णालयात नेले. पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगत नजिक असलेल्या MIDC Tarapur police पोलिस स्टेशनला हा प्रकार कळवला.
कृताली आणि कनिश्क यांचा 2017 मध्ये प्रेमविवाह झाला होता. दोघे वेगळ्या जातीचे होते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कनिश्क पाटीलचे बोईसर मध्ये गॅरेज आहे. तेथे तो चारचाकी दुरूस्तीचे काम करतो सोबतच त्याचे स्थानिक पातळीवर राजकीय क्षेत्रात संबंध आहेत. कृतालीच्या शरीरावर मानेवर मार्क्स आढळले आहेत. यावरून पोलिसांना तिची हत्या झाल्याचा संशय आहे. नक्की वाचा: Brutal Murder of Wife: पत्नीचे कापलेले डोके हातात घेऊन परिसरात फिरत राहिला पती; Valentine's Day दिवशी समोर आली हत्येची धक्कादायक घटना .
पोस्टमार्टमच्या प्राथमिक अंदाजावरून कृतालीचा मृत्यू गुदमरून झाला आहे. यावरून तिचा गळा दाबण्यात आल्याचा संशय बळावला. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली त्यामध्ये आरोपी पती कनिश्कने आपला गुन्हा कबूल केला आहे. कृताली आणि कनिश्कला साडेचार वर्षांचा मुलगा आहे.