Shridhar Chamre: पाकिस्तानच्या गोळीबारात पालघर येथील खलाशी श्रीधर चामरे यांचा मृत्यू; सरकारकडून 5 लाखांची मदत

या गोळीबारात 'जलपरी' (Jalpari) या मच्छिमार नौकेवरील खलाशी श्रीधर चामरे (Shridhar Chamre) नावाचे खलाशी मृत्यू पावले.

Palghar Sailor Shridhar Chamre killed in Pakistani firing | (Photo Credit: Archived, edited, representative images)

भारत-पाकिस्तान (India–Pakistan Border) सीमेजवळ मासेमारी करणाऱ्या मच्छिमार नौकेवर (Fishing Boat)  पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीने गोळीबार केला. या गोळीबारात 'जलपरी' (Jalpari) या मच्छिमार नौकेवरील खलाशी श्रीधर चामरे (Shridhar Chamre) नावाचे खलाशी मृत्यू पावले. श्रीधर चामरे हे पालघर (Palghar) जिल्ह्यातील वडराई येथील रहीवाशी आहे. चामरे (Shridhar Chamre Death Update) यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी याबाबत माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार,जलपरी-4 ही मच्छिमार नौका 7 खलाशांसह गुजरात राज्यातील ओखा (जि. वेरावळ) येथून 25 ऑक्टोबर रोजी मासेमारीस गेली. मासेमारी करत ही नौका भारत-पाकीस्तान समीमेजवळ पोहोचली. समेजवळ मासेमारी करत असताना पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका खलाशाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. श्रीधर रमेश चामरे असे मृत खलाशाचे नाव आहे.

श्रीधर चामरे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला. चामरे यांच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी माहिती दिली. तर ठाणे-पालघर जिल्ह्याचे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी श्रीधर चामरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला. (हेही वाचा, Gujarat: पाकिस्तान मरीन कमांडोकडून भारतीय बोटसह 6 मच्छिमारांचे केले अपहरण, गोळीबारात एकाचा मृत्यू)

ट्विट

'जलपरी' ही मच्छिमार बोट गुजरात येथील वनगबरा येथील नानाजी राठोड यांच्या मालकीची आहे. श्रीधर चामरे हे जलपरी या मच्छिमार बोटीवर पाठीमागील तीन महिन्यांपासून खलाशी म्हणून काम करत होते. प्राप्त माहितीनुसार, 'जलपरी' ही भारतीय हद्दीत मासेमारी करत होती. यावेळी पाकिस्तानी मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीकडून भारतीय हद्दीत झाला आणि त्यांनी मच्छिमार नौकेवर बेछुट गोळीबार केला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif