Palghar: विकेंडला Asheri Fort वर पर्यटकांची तोबा गर्दी; 250 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल (Watch Video)

शनिवारी आणि रविवार सुट्टी असल्याने हजारो पर्यटक आणि ट्रेकर्स किल्ल्यावर दाखल झाले होते.

Overcrowding of tourists at Asheri Fort in Palghar (Photo Credits: Youtube)

पालघर (Palghar) जिल्ह्यातील अशेरी किल्ल्यावर (Asheri Fort) फिरण्यासाठी आलेल्या तब्बल 250 हून अधिक पर्यटकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-अहमदाबाद हायवे (Mumbai-Ahmedabad Highway) वर स्थित असलेल्या मेंढवण खिंडीजवळ (Mendhavan Khind) हा किल्ला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी आणि रविवार सुट्टी असल्याने हजारो पर्यटक आणि ट्रेकर्स किल्ल्यावर दाखल झाले होते. किल्ल्यावर झालेल्या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडिया माध्यमात व्हायरल झाला असून यामध्ये कोरोना नियम पायदळी तुटवल्याचे दिसून येत आहे. मास्क न घालता आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करता पर्यटकांची तोबा गर्दी याठिकाणी पाहायला मिळत आहे.

या घटनेची माहिती मिळताच कासा पोलिस (Kasa Police) या किल्ल्याच्या पायथ्याजवळील गावांत पोहचले. त्यानंतर त्यांनी किल्ल्यावरुन येणाऱ्या पर्यटकांकडून दंड आकारण्यास सुरुवात केली. एकूण 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पहा व्हिडिओ:

आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 250 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा किल्ला मान्सून काळात पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र आहे. त्याचबरोबर बहुतांश ट्रेकर्स देखील पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी या किल्ल्याला पसंती देतात. (Maharashtra Unlock: कोविड-19 संसर्गाचा वेग मंदावल्याने पालघर मध्ये पर्यटकांना परवानगी)

दरम्यान, पालघर जिल्हा 14 ते 20 जून दरम्यान अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात होता. त्यामुळे येथील पर्यटन क्षेत्र खुलं करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. मात्र विकेंडला या किल्ल्यावर झालेल्या गर्दीनंतर सोमवारपासून पालघर जिल्ह्यामध्ये लेव्हल तीनची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत सर्व किल्ले, सुमद्रकिनारे आणि इतर सार्वजनिक ठिकाणं पर्यटकांसाठी  बंद करण्यात आले आहेत.