Palghar News: पालघर सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
बोईसर मधील इको एडन सिटी येथे राहणारी तीन मुले माकड चोळा जवळील सूर्या नदीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. त्यापैकी एका मुलाला वाचवण्यात यश आले असून दोन मुले बेपत्ता झाली.
पालघरमधील सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू . पालघरच्या कीराट जवळ ही दुर्घटना घडली. दोघंही तरुण बोईसरच्या इको एडनशी पार्क येथील रहिवाशी आहेत. सूर्या नदीत अंघोळीसाठी गेले असता दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे तर एकाला सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं आहे. दुपारच्या सुमारास नदी पात्रात पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने यातील दोन मुले बुडाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा देखील केला आहे. (हेही वाचा - Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसानं विदर्भासह मराठवाड्याला झोडपलं, बीडमध्ये 500 कोंबड्यांचा मृत्यू)
बोईसर मधील इको एडन सिटी येथे राहणारी तीन मुले माकड चोळा जवळील सूर्या नदीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. त्यापैकी एका मुलाला वाचवण्यात यश आले असून दोन मुले बेपत्ता झाली. यातील दोन मुलांचे मृतदेह मिळाले आहेत. या घटनेची खबर मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी पोहोचले व स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)