Palghar News: पालघर मध्ये गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून मृत्यू

पालघर येथे विर्सजनाच्या वेळी दोघांचा नाल्यात बुडून आणि एकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Drown | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Palghar News: पालघर येथे विर्सजनाच्या वेळी दोघांचा नाल्यात बुडून आणि एकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर येथील या  घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सांयकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. नाल्यात पाण्याचा अंदाज न आल्याने पालघर येथील कोनसई येथील नाल्यात दोघांचा मृत्यू झाला. तर गो हे येथील तलावात एकाचा मृत्यू झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगत नारायण मौर्य( वय 38)सुरज नंदलाल प्रजापती (25)अशी कोनसई येथील नाल्यात तर प्रकाश नारायण ठाकरे( वय 35)हा गो-हे येथील तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पालघरच्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पालघर मधल्या विर्सजन करताना दुर्देवी मृत्यू झाल्याची नोंद पोलीसांनी घेतली आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने दोन ठिकाणी दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे पोलीसांनी विसर्जनावेळी सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे.