Palghar News: पाण्यासाठी वणवण करणाऱ्या आईसाठी खोदली विहीर, पालघर येथील 14 वर्षीय प्रणव साळकर याची कामल (Watch Video)
प्रणवच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. प्रणव याने आपल्या वडिलांच्या सहकार्याने ही कामगिरी केली आहे. प्रणव सालकर केळवे (Kelve Village) दावांगेपाडा येथील रहीवासी आहे
Palghar News: पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या आईला पाहून हृदय द्रावलेल्या 14 वर्षीय प्रणव रमेश सालकर (Pranav Ramesh Salkar) याने चक्क घरासमोर विहीर खोदली आहे. प्रणवच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. प्रणव याने आपल्या वडिलांच्या सहकार्याने ही कामगिरी केली आहे. प्रणव सालकर केळवे (Kelve Village) दावांगेपाडा येथील रहीवासी आहे. प्रणव याची आई वडील हे शेतमजूर म्हणून काम करतात. दिवसभर मजूरीला जायचे आणि नंतर पाण्यासाठी वणवण करायची. आईचे कष्ट पाहून प्रणवच्या डोळ्यात पाणी यायचे. आईला काहीतरी मदत करायला हवी या भावनेने तो व्याकूळ व्हायचा त्यातून त्याने हा निर्णय घेतला.
प्रणव याने अंगणात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने पाहार आणि इतर आवजारे आणली आणि विहीर खोदण्यास सुरुवात केली. त्याने अंगणात खड्डा खणायला सुरुवात केली. ते पाहून त्याच्या वडीलांनाही हुरुप आला. वडिलांनीही त्याच्या कामात हातभार लावत कामाला सुरुवात केली. त्यांनी दररोज थोडा थोडा असे सलग 12 दिवस काम केले. बारा दिवसांमध्ये साधारण पंधरा फूट खोल खड्डा खणला. पंधराव्या दिवशी विहीरीला पाणी लागले. त्यांची विहीर खोदून पूर्ण केली.
ट्विट
खणलेल्या विहीरीबद्दल बोलताना प्रणव सांगतो की, विहीर खोदताना मध्येच खडक लागला. मग खडक, दगड काढण्यासाठी आम्ही शिडी बनवली. त्याद्वारे माती, दडड, खडक, मुरुम वरती आणला. या कामात त्याला वडिलांनीच मोठी मदत झाली. दरम्यान, विहीरीला पाणी लागले. आमचा आनंद गगनात मावेना. आई दर्शना आणि वडिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून खूप छान वाटले.