Palghar Mob Lynching Case: पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील 14 जणांना जामीन मंजूर

Maharashtra, Palghar, Palghar Mob Lynching Case, Thane, Thane Court, महाराष्ट्र, पालघर, पालघर साधू हत्याकांड प्रकरण, ठाणे न्यायालय.

Court Hammer | (Photo Credits-File Photo)

Palgahr Mob Lynching Case: पालघर मधील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्यापैकी 14 आरोपींना जामीन मंजूर केला आहे. ठाणे न्यायालयाने (Thane Court) या आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र कोर्टाचे विशेष न्यायाधीश आर.एस. गुप्ता यांनी अन्य 18 आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला, असे वकील अमृत अधिकारी यांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. या प्रकरणात एकूण 201 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 75 मुख्य आरोपी आहेत. विशेष सरकारी वकील सतीश मानेशिंदे हे खटल्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तर, वकील पी एन ओझा हे साधूंच्या कुटूंबाचे आहेत.

पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात 16 एप्रिल रोजी कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे गुजरातकडे चालले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे गुजरातची सीमा बंद होती. ज्यामुळे पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे त्यांचे वाहन पुन्हा माघारी फिरले. वाहन मागे येताच त्याठिकाणी अचानक लोक जमा झाले. जवळपास हजार लोकं होती. त्यांच्या हातात लाठ्या काठ्या, कोयते आणि कुऱ्हाडी होत्या. काही कळायच्या आत लोकांनी या तिघांना मारहाण सुरू केली. ज्यात तिघांचाही मृत्यू झाला होता. हे देखील वाचा- Amravati: अमरावती येथील एका दिव्यांग शेतकऱ्याने तहसिल कार्यालयातच घेतले विष

या पालघर साधू हत्याकांड प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. याप्रकरणी 4 हजार 955 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.