पालघर येथे वीज पडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू

पालघर (Palghar) येथील एका ठिकाणी वीज पडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पालघर येथे वीज पडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईसह राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर या पावसाचा परिणाम नागरिकांवर सुद्धा होत आहे. पालघर (Palghar) येथील एका ठिकाणी वीज पडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

महेंद्र बडगा असे मुलाचे नाव आहे. दुपारी महेंद्र आपल्या मित्रांसोबत अंगणात खेळत होता. परंतु अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.(मुंबई: पहिल्याच पावसात दादर येथे भिंत कोसळून 3 जखमी, गोरेगाव मध्ये विजेच्या धक्का लागून 3 जण मृत्यू)

या धक्कादायक दुर्घटनेमुळे बडगा कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. तर पालघरसह विक्रमगड तालुक्यातसुद्धा मुसळधार पाऊस पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2019 08:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).