Palghar: वडिलांचा मृत्यू झाल्याने कोरोनाची टेस्ट, क्वारंटाइन होण्याच्या भीतीने मुलींनी घरातच लपवला मृतदेह
वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आता कोरोनाची चाचणी आणि क्वारंटाइन व्हावे लागेल याच भीतीने त्यांचा मृतदेह घरातच लपवून ठेवल्याची धक्कादायक बाब पालघर येथून उघडकीस आली आहे.
वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आता कोरोनाची चाचणी आणि क्वारंटाइन व्हावे लागेल याच भीतीने त्यांचा मृतदेह घरातच लपवून ठेवल्याची धक्कादायक बाब पालघर येथून उघडकीस आली आहे. मृतदेह सडल्याचा वास न येण्यासाठी त्यावर अत्तर, कापूर आणि अगरबत्त्यांचा वापर केला गेला. या प्रकरणी एका मुलीने सुद्धा नैराश्याने आत्महत्या केल्याची ही बाब समोर आली आहे.(मंगळसुत्र गहाण ठेवून दिली पतीच्या खूनाची सुपारी; भिवंडी येथील धक्कादायक घटना)
सहकार या नावाचे एक कुटुंब विरार मध्ये राहत होते. तर कुटुंबप्रमुख हरिदास सहकार हे आजारी असल्याने त्यांचा राहत्या घरीच मृत्यू झाला. मात्र वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी आजूबाजूच्या लोकांना कळली आणि त्यांनी आपल्याला कोरोनाची चाचणीसह क्वारंटाइन केले याची भीती त्यांच्या तीन मुलांना वाटत होती. त्यामुळे त्या मुलींनी वडिलांचा मृतदेह घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. तर नैराश्यामुळे तीन बहिणींमधील मोठी मुलगी विद्या हिने नवापुर येथील समुद्रात उडी मारत आत्महत्या केली. तिचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.(Pune: मेडिकलमधून कंडोम आणून देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मित्रावर चाकूने वार)
तपासात असे ही समोर आले की, मृतदेहाचा दुर्गंध येऊ नये म्हणून त्यावर विविध गोष्टी वापरल्या गेल्या.अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, हे प्रकरण अशा वेळी समोर आले जेव्हा सहकार यांची लहान मुलगी स्वप्नाली हिने सकाळच्या वेळेस नवापुर येथील समुद्रात उडी मारली. मात्र तिला स्थानिकांनी वाचवले. अर्नाळा समुद्र स्थानकाचे वरिष्ठ राजू माने यांनी असे म्हटले की, मुलांनी भीती होती की वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना सुद्धा क्वारंटाइन व्हावे लागेल. पोलिसांनी जेव्हा सुरुवातीला तपास केला तेव्हा त्यांना आत्महत्या केल्याचा संशय होता. मात्र आता दुर्दैवी मृत्यूची दोन प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. मुलीने पोलिसांना हे सुद्धा सांगितले की, त्यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडली आहे. मात्र घराची परिस्थिती अधिक बिकट आहे. दोन्ही बहिणींची लग्न सुद्धा झाली नव्हती.