Palghar Double Murder: बोईसर मध्ये 2 वृद्धांवर कुर्‍हाडीचे वार करत हत्या; आरोपी मानसिक रूग्ण असल्याचा अंदाज

पोलिसांनी जबरदस्तीने त्याला बाहेर खेचून काढलं आणि नंतर अटक केली.

Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पालघर (Palghar) मध्ये एक थरारक प्रकार समोर आला आहे. कथितरित्यामानसिक रूग्ण असलेल्या एका व्यक्तीने बोईसरच्या (Boisar) कुदान गावामध्ये (Koodan village) दोन जणांची हत्या केली आहे.  कुर्‍हाडीने हल्ला करत त्याने दोघांचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या हत्येनंतर जेव्हा आजुबाजूच्या लोकांमध्ये खळबळ पसरली तेव्हा आरोपीने तेथून पळ काढला होता. पोलिसांनी नंतर आरोपीला जवळच असलेल्या जंगलातील दलदलीच्या तलावात लपून बसला होता. आरोपीचं नाव Kishor Kumar Mandal  आहे.

पालघर मधील कुदन गावामध्ये मागील 2-4 दिवसांपासून एक अज्ञात व्यक्ती फिरत होता. स्थानिकांच्या माहितीनुसार हा व्यक्ती मानसिक रूग्ण वाटत होता. त्यामुळे लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतू गुरूवारी 29 फेब्रुवारी दिवशी अचानक या तरूणाने वयोवृद्धावर कुर्‍हाडीने हल्ला केला. हत्येनंतर काहीवेळ तो मृतदेहापाशी बसला होता. Nagpur Crime: नागपूर येथे आयटी कर्मचाऱ्याकडून वरिष्ठांची हत्या, कामाच्या कामगिरीच्या वादातून कृत्य .

पहा ट्वीट

मृत व्यक्तीचा भाऊ त्याची शोधाशोध करत पोहचला. त्यावेळी मानसिक रूग्ण आरोपीने त्याच्यावरही  कुर्‍हाडीने सपासप वार केले. घटनास्थळी या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला. या दोन हत्या झाल्यावर आरोपीने एका व्यक्तीच्या घराच्या दरवाज्यावर देखील कोयत्याने वार केले. पोलिस घटनास्थळी पोहचली. आरोपीचा शोध घेण्यासाठी सुमारे 150 पोलिसांचा ताफा बोलावण्यात आला होता.

सर्च ऑपरेशन दरम्यान आरोपी एका दलदलीत लपून बसलेला दिसला. पोलिसांनी जबरदस्तीने त्याला बाहेर खेचून काढलं आणि नंतर अटक केली. पोलिसांनी आरोपी मानसिक रूग्ण आहे की नाही हे तपासण्यासाठी काही चाचण्या केल्या जातील नंतर त्याची माहिती दिली जाईल असं म्हटलं आहे.