Palghar: पालघरमध्ये 19 वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्कार, दोन जणांवर आरोप
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, महिलेने भीतीपोटी या घटनेची माहिती आधी कोणालाही दिली नाही, परंतु तिचे बदललेले हावभाव पाहून कुटुंबीयांना संशय आला. घरच्यांनी तिला याचे कारण विचारले असता महिलेने याबाबत सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.
महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात एका 19 वर्षीय आदिवासी महिलेवर कथित बलात्कार (Tribal Woman Raped) झाल्याची बातमी समोर येत आहे. या घटनेत दोघांवर बलात्काराचा आरोप आहे. जव्हार तालुक्यातील एका गावात ही घटना घडल्याची माहिती जव्हार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. रविवारी (20 फेब्रुवारी) दोन जणांनी त्या आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या दोघांनी मुलीला शेतातील धान्य गोदामात नेले आणि तेथे त्यांनी आळीपाळीने संबंधित आदिवासी महिलेवर बलात्कार केला. या लोकांनी बलात्कारानंतर महिलेला धमकावले. ही बाब कोणाला सांगितल्यास जीव गमवावा लागेल, असे या लोकांनी संबंधित महिलेला सांगितले.
दोन्ही आरोपींनी धमकी दिल्याने महिला घाबरली होती. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, महिलेने भीतीपोटी या घटनेची माहिती आधी कोणालाही दिली नाही, परंतु तिचे बदललेले हावभाव पाहून कुटुंबीयांना संशय आला. घरच्यांनी तिला याचे कारण विचारले असता महिलेने याबाबत सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक होऊ शकलेली नाही
संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सध्या आरोपींना पकडण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना लवकरच पकडण्यात येईल. (हे ही वाचा Nagpur: अल्पवयीन भाच्यावर मामी भाळली, लैंगिक शोषण करुन क्लिप काढली, धमकीही दिली, गुन्हा दाखल)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रविवारी 19 वर्षीय आदिवासी महिला पालघर जिल्ह्यातून कामावरून निघाली होती. दरम्यान, दोघांनी तिला पकडून जवळच असलेल्या धान्य गोदामात नेले आणि दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. सोबतच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला घाबरून संबंधित महिलेने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र घरच्यांनी तिला समजावून विचारले आणि तिच्या घाबरलेल्या वागण्याचे कारण विचारले असता तिने ही संपूर्ण घटना सांगितली.