Pahalgam Terror Attack: मुंबई पोलिसांंनी 17 पाकिस्तानी नागरिकांची पटवली ओळख; Exit Permits जारी

मागील 3 दिवसांत भारतामध्ये 850 देशवासिय आले आहेत. केवळ रविवारी म्हणजे काल 27 एप्रिलला 237 पाकिस्तानी परतले आहेत तर 16 भारतीय आले आहेत.

Mumbai Police | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तान विरूद्ध कारवाईला सुरूवात केली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे सारे व्हिसा रद्द करत त्यांना तातडीने त्यांच्या मूळ देशात परतण्याचे आदेश दिल्यानंतर आता मुंबई मध्येही मुंबई पोलिसांकडून 17 पाकिस्तानी नागरिकांना शहर सोडण्यासाठी Exit Permits देण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुदतपूर्व सारे पाकिस्तानी नागरिक भारतातून बाहेर पडले असतील याची खात्री करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्येक मुख्यमंत्र्याला फोन करून दिल्या आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांना ठार केल्यानंतर सध्या जनभावनेमध्ये कमालीचा राग आणि दु:ख आहे. त्यामुळे आता short-term किंवा tourist visas वर भारतात आलेल्यांना देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार मागील 3 दिवसांत 537 पाकिस्तानी नागरिकांनी अटारी बॉर्डर मार्गे देश सोडला आहे. 27 जानेवारीपर्यंत पाकिस्तानी नागरिकांना परतण्याची अंतिम मुदत होती. तर मेडिकल व्हिसा असणार्‍यांसाठी ही मुदत 29 एप्रिल पर्यंत आहे. नक्की वाचा: Pahalgam Terror Attack: 'देशाबद्दल काहीच न वाटणाऱ्या लोकांची मला कीव येते'; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर Devendra Fadnavis यांची टीका (Video). 

ANI वृत्तसंस्थेशी बोलताना Arun Pal, a protocol officer at the Attari Border यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 3 दिवसांत भारतामध्ये 850 देशवासिय आले आहेत. केवळ रविवारी म्हणजे काल 27 एप्रिलला 237 पाकिस्तानी परतले आहेत तर 16 भारतीय आले आहेत. इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने दिल्लीत राहणाऱ्या सुमारे 5000 पाकिस्तानी नागरिकांची यादी दिल्ली पोलिसांना दिली आहे जेणेकरून हे लोक घरी परततील.Foreign Regional Registration Office ने (FRRO) ही यादी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला शेअर केली आहे आणि पुढील पडताळणी आणि ओळख पटविण्यासाठी ती संबंधित जिल्ह्यालाही शेअर करण्यात आली आहे. या यादीत Long-term Visas (LTV) असलेल्या आणि सूट मिळालेल्या हिंदू पाकिस्तानी नागरिकांची नावे समाविष्ट आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement