मुंबई: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; टिटवाळा स्थानकामध्ये ओव्हरहेड वायर तुटली
मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकामध्ये ओव्हरहेड वायर तुटल्याने सध्या मध्य रेल्वेची जाणारी आणि येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मध्य रेल्वेची आज ( 14 ऑक्टोबर) दुपारी विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या टिटावाळा स्थानकामध्ये ओव्हरहेड वायर तुटल्याने सध्या मध्य रेल्वेची जाणारी आणि येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई लोकलसोबतच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील स्टेशन मध्ये खोळंबल्या आहेत. मध्य रेल्वेकडून या ओव्हरहेड वायरच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. गोदान एक्सप्रेस देखील रखडली आहे.
सध्या मुंबई लोकल कल्याण स्थानकाहून पुन्हा सीएसएमटी स्ठानकाच्या दिशेने रवाना करण्यात आल्या आहे. मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी मुंबई लोकल आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी खोळंबल्याने सामान्यांना नाहक त्रास होत आहे.
दरम्यान दर रविवारी मुंबई लोकलचं दुरूस्तीचं, डागडुजीचं काम करण्यासाठी मेगा ब्लॉक हाती घेतला जातो. कालच जॅम्बो ब्लॉक घेण्यात आला होता मात्र आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबई लोकलची वाहतूक रखडली आहे. त्यामुळे ट्रेन आणि प्लॅटाफॉर्मवर मोठी गर्दी आहे. मध्य रेल्वेकडून वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.