Nanded Molestation Case: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची शिक्षकाने काढली छेड, संतप्त जमावाकडून तोडफोड (Watch Video)

नांदेडमध्ये कोंचिग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची शिक्षकाने छेड काढली.

Nanded Molestation Case PC X

Nanded Molestation Case: राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना आणखी एक नांदेड (Nanded) येथून संतापजनक घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये कोंचिग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची शिक्षकाने छेड काढली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच, कोचिंग क्लास मालवकावर आणि शिक्षकांवर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे आणि क्लासची तोडफोड केली. (हेही वाचा- लखनऊमध्ये चालत्या स्कॉर्पिओमध्ये मॉडेलसोबत सामूहिक बलात्कार, चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने बोलवले होते

 मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षणाऱ्या नववीच्या विद्यार्थींनीची शिक्षकाने छेड काढली. या घटनेनतंर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना नैतन्यनगर परिसरातील आहे. विद्यार्थींनीची छेड काढल्याप्रकरणी आरोपी शिक्षकावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन मुलीची शिक्षकाने काढली छेड, संतप्त जमावाकडून तोडफोड

संतप्त जमावाने कोचिंग क्लासची तोडफोड केली. रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी शिक्षकाला भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नांदेडच्या या घटनेनतंर शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोचिंग क्लासमध्ये शिक्षणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी एकीकडे सुरक्षतेची चिंता व्यक्त केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif