महाराष्ट्र: अतिवृष्टीमुळे संत्र्यांचे भाव कोसळले, बागायतदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान
यामुळे शिल्लक राहिलेल्या संत्र्यांवर शेतक-यांनी लाखो रुपये खर्च करुन औषध फवारणी केली.
महाराष्ट्रात यंदा अपेक्षेपेक्षा जास्तच पाऊस पडला. यामुळे पिकांचे आणि बागायतदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आपल्यावर आलेल्या या संकटामुळे शेतक-यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या संत्री (Orange) उत्पादक प्रचंड चिंतेत आहे. 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने विकली जाणारी संत्री केवळ 12 ते 15 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. यामुळे संत्री बागायतदार पुरता हवालदिल झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे बागांचे प्रचंड नुकसान झालेले असताना संत्र्याला पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे जुलै ते सप्टेंबर महिन्यात संत्र्यांच्या बागांचे नुकसान झाले. यामुळे शिल्लक राहिलेल्या संत्र्यांवर शेतक-यांनी लाखो रुपये खर्च करुन औषध फवारणी केली. ज्यामुळे ती चांगली टिकून राहतील. मात्र एवढं सगळं करुनही संत्र्याला चांगला बाजारभाव मिळाला नाही. 50 रुपये प्रति किलोचा भाव कोसळून 12 ते 15 रुपये प्रतिकिलोवर आला. हेदेखील वाचा- Flood in Maharashtra: अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी राज्य सरकारसोबत केंद्रानेही उभं रहावं; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची केंद्र सरकारकडे भरीव मदतीची मागणी
तर दुसरीकडे मोर्शी आणि वरूड तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संत्री बागा आहेत. टाळेबंदीमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. शेतकऱ्यांकडे मोठय़ा प्रमाणात संत्री असूनदेखील संत्र्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. संत्र्याला चांगला भाव मिळून पैसा हातात येईल, या आशेवर असलेला शेतकरी भीषण दुष्काळ, टोळधाड, संत्री फळगळती, संत्रा झाडाची पानगळ, करोना, या सर्व संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
संत्र्यांचे अन्य फळांच्या बागांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर धान्य पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले असून शेतक-यांना सरकारकडून योग्य ती मदत दिली जावी अशी अपेक्षा केली जात आहे.