अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लिन चीट; ACB च्या शपथपत्रावर देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप
यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणावीस यांनी आक्षेप नोंदवला आहे.
राष्ट्रवादी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आज (20 डिसेंबर) एसीबीने (Anti Corruption Bureau) सिंचन घोटाळा प्रकरणी क्लीनचीट दिली आहे. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणावीस यांनी आक्षेप नोंदवला आहे. दरम्यान एसीबीने कोर्टात दाखल केलेले शपथपत्र हे दिशाभूल करणारे असून कोर्ट हे प्रतिज्ञापत्रक स्वीकारले जाणार नसल्याचं म्हटलं आहे. सिंचन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना एसीबी कडून पूर्णपणे क्लिनचीट.
सिंचन घोटाळयात मंत्र्यांकडून जाबाबदारी काढून अधिकार्यांवर घोटाळ्याची जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान 2018 चा निर्णय रद्द करण्यासाठी पुरावा सादर करण्यात आला नाही त्यामुळे न्यायालयात स्वीकारले जाऊ शकत नाही असं म्हणत विधिमंडळ सभागृहात हा मुद्दा उचलला जाणार असल्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्याशी थेट संबंध जोडता येणार नाही, असं अँटी करप्शन ब्युरोने (ACB) हायकोर्टात सांगत त्यांना दिलासा दिला आहे. एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्रक सादर केलं आहे. यामध्ये विदर्भातील विविध सिंचन प्रकल्पांतील सर्वच प्रकरणांत अजित पवार यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.