Devendra Fadnavis Statement: MSRTC कर्मचाऱ्यांच्या समस्येवर महाराष्ट्र सरकारची असंवेदनशील भूमिका, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची टीका

कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे त्यांनी डोळेझाक केली आहे, असे फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले, पगार वेळेवर न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत.

Devendra Fadnavis | (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या संपावर महाविकास आघाडी सरकारने (Maharashtra Government) तातडीने पाऊल टाकून तोडगा काढावा, असे आवाहन भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.  MSRTC कर्मचारी 25 ऑक्टोबरपासून महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संपावर आहेत. जेणेकरुन त्यांना सरकारी कर्मचारी समजले जावे. तसेच सरकारी नोकरांना मिळणारे पगार आणि लाभ मिळू शकतील. महाराष्ट्रातील 250 बस डेपोपैकी सुमारे 247 बस बंद आहेत.

सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे त्यांनी डोळेझाक केली आहे, असे फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले, पगार वेळेवर न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. हे महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी चांगले नाही. सरकारने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली असती तर अशी आंदोलने झाली नसती. हेही वाचा 'या लढाईमध्ये मी एकटा नाही, संपूर्ण मंत्रिमंडळ, शरद पवार, पक्ष माझ्यासोबत, मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक- मंत्री Nawab Malik यांची माहिती

कर्मचारी संघटनांशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी कोणीही पोहोचले नाही, असे सांगून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्मचाऱ्यांना प्रतिस्पर्ध्यांची वागणूक देऊ नये आणि प्रश्नांचा तार्किक शेवट करा, असा सल्ला दिला.  मुंबईतील आझाद मैदानावर हजारो MSRTC कर्मचारी आंदोलन करत आहेत.  भाजपचे किरीट सोमय्या यांनीही कर्मचाऱ्यांशी एकता व्यक्त केली आहे. भाजप कर्मचार्‍यांच्या हक्कांसाठी लढेल आणि सरकार प्रतिसाद देईल याची खात्री करेल, ते म्हणाले.

रयत क्रांती पक्षाचे नेते सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. MSRTC अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा संप सरकारी आणि कर्मचारी दोघांसाठीही वाईट आहे कारण 100 कोटी रुपयांचे नुकसान आधीच नोंदवले गेले आहे.बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आणि कामावर परतण्याचे आवाहन केले होते.