ऑटोरिक्षाचे स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, पण कुठे जायचे हे मागे बसलेले ठरवतात- देवेंद्र फडणवीस
राज्यात सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. नुकतीच महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या पहिली बैठक (BJP Executive Committee Meeting) पार पडली.
कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणाने चांगलाच पेट घेतला आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. नुकतीच महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या पहिली बैठक (BJP Executive Committee Meeting) पार पडली. दरम्यान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाला जी मुलाखत दिली त्या मुलाखतीतल्या एका वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ऑटोरिक्षाचे स्टिअरिंग उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, पण कुठे जायचे हे मागे बसलेले ठरवतात, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच आम्हाला सरकार पाडण्यात काहीही इंटरेस्ट नाही, तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडाण्यासाठी सक्षम आहात असेही फडणवीस यांनी सुनावले आहे.
महाविकास आघाडीवर कायम तीन चाकांचे सरकार असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहेत. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, होय आमचे सरकार तीन चाकी आहे. रिक्षा आहे, गोरगरीबांचे सरकार आहे. ज्याचे स्टिअरिंग माझ्या हाती आहे. जनतेने दाखवलेला विश्वास हेच माझे बळ आहे. तीन चाकी तर तर तीन चाकी तिन्ही चाके एका दिशेने चालत आहेत हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. असे म्हणत त्यांनी भाजपाच्या टीकेला उत्तर दिले होते. मात्र आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या स्टिअरिंग वक्तव्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. हे देखील वाचा- शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते शशिकांत चव्हाण यांच्या हाती पुन्हा शिवबंधन
तसेच, आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही, पण किमान सरकार चालवून तर दाखवा. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडायला सक्षम आहात. हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, हे धोक्याने आलेले सरकार आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचे काम आहे. कोरोनाचे संकट ओळखून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठे काम केले. मुंबईत मोठ्या संसर्गामुळे काम करणे अतिशय कठीण होते. तरी सुद्धा अतिशय चांगले काम पक्षाने केले. 30 कार्यकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागले. आम्ही सारे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत, असेही देवेंद्र फडवणवीस म्हणाले आहेत.