Ajit Pawar: विरोधीपक्ष नेते अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला, या खास भेटीत दडलयं का? राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
विरोधीपक्ष अजित पवार यांनी शेतकरी, अवकाळी पाऊस, शेतकरी मदत तसेच दिवाळी पॅकेजबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर चर्चा केली.
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. तरी या खास भेटीमागे दडलयं काय अशी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. तरी अजित पवार यांनी यासंबंधीत ट्वीट (Tweet) करत या भेटीची माहिती दिली आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात व शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याबाबत आग्रही मागणी केली असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते अजित पवार (Opposition Ajit Pawar) यांनी केली आहे. तसेच राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सोबत चर्चा केली असल्याची माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. तरी या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा होत आहे. कारण अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागचं कारण वेगळचं आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीचं राज्य सहकारी बॅंकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी (State Cooperative Bank Scam) पुन्हा एकदा फेरतपासणी केल्या जाणार आहे. 'इओडब्ल्यू'ने आपल्या भूमिकेत बदल करून प्रोटेस्ट याचिकांमधील मुद्दे व ईडीने मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन फौजदारी दंड संहितेच्या कलम 173 अन्वये फेरतपास सुरू केला असल्याची माहिती शनिवारी दिली आहे. तरी आता अजित पवार (Ajit Pawar) ईडीच्या रडारावर (ED Enquiry) असण्याची चर्चा आहे. यासंबंधीत अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मध्ये खलबत झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हे ही वाचा:- State Cooperative Bank Scam: आता अजित पवार ईडीच्या रडारावर? राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीची शक्यता)
तरी ही एक औपचारीक भेट असुन यांत केवळ राज्याच्या हितासाठीची चर्चा झाली असल्याची माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. विरोधीपक्ष म्हणून कार्यरत असणारे अजित पवार यांनी शेतकरी (Farmer), अवकाळी पाऊस (Rain), शेतकरी (Farmer) मदत तसेच दिवाळी पॅकेजबाबत (Diwali Package) चर्चा केली असल्याचंही अजित पवार म्हणाले.