ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, त्यांनाच रुग्णालयांमध्ये बेड मिळायला हवे- मुंबई महापौर किशोरी पेडणेकर
राज्यात दिवसेदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली होऊ लागली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे जाळे पसरत चालले आहे. राज्यात दिवसेदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली होऊ लागली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रुग्णालयांवर खूप दवाब आहे. यामुळे ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे आणि आपातकालीन स्थितीत आहेत, अशा रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड मिळायला हवे आहेत, असे स्पष्टीकरण मुबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी दिले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत आज 1 हजार 274 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 57 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 128 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 575 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 19,978 जणांना कोरोनावर मात केली आहे.
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, किशोरी पेडणेकर म्हणाले की, जे लोक गंभीर आणि आपातकालीन परिस्थितीत आहेत त्यांनाच रुग्णालयांमध्ये बेड मिळायला हवे. महत्वाचे म्हणजे, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसून येतात, अशा लोकांना आवश्यकता नसतानाही रुग्णालयातील बेड मिळावे, असे वाटते. तसेच सध्या रुग्णालयावर खूप दबाव आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- Coronavirus In Mumbai Update: मुंबईत एकूण 47 हजार 128 कोरोनाबाधित; दिवसभरात 1 हजार 274 नव्या रुग्णांची नोंद तर, 57 मृत्यू
एएनआयचे ट्विट-
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत आहे.