Coronavirus In Mumbai Update: मुंबईत एकूण 47 हजार 128 कोरोनाबाधित; दिवसभरात 1 हजार 274 नव्या रुग्णांची नोंद तर, 57 मृत्यू
मुंबईत (Mumbai) आज 1 हजार 274 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 57 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 128 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 575 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 19,978 जणांना कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत (Mumbai) आज 1 हजार 274 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 57 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 128 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 575 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 19,978 जणांना कोरोनावर मात केली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- लॉकडाऊन काळात राज्यात कोविड-19 संदर्भात 1 लाख 23 हजार गुन्ह्यांची नोंद, तर 6 कोटी 54 लाख रुपयांचा दंड; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
एएनआयचे ट्वीट-
1274 #COVID19 cases & 57 deaths reported in Mumbai today, taking the total number of cases to 47,128 & death toll to 1575: Greater Mumbai Municipal Corporation pic.twitter.com/M8OXlhn1RZ
— ANI (@ANI) June 6, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2020 09:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

