IPL Auction 2025 Live

Online Share Trading Fraud: ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा प्रकरणात मुंबई सायबर पोलीसांकडून प्रमुख संशयितांना अटक; तब्बल 1.17 कोटी रुपयांची फसवणूक

त्याच्यावर नलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याच्या माध्यमातून त्याने 1.17 कोटी रुपयांची फसवणूक (Online Share Trading Scam Fraud) केली आहे.

Online Share Trading Fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

Online Share Trading Scam: वरळी येथील सेंट्रल रिजन सायबर पोलीस (Mumbai Cyber Police) स्टेशनने कारवाई करत उदयपूर (Udaipur) येथून एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर नलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याच्या माध्यमातून त्याने 1.17 कोटी रुपयांची फसवणूक (Online Share Trading Scam Fraud) केली आहे. समर्थ विजय सिंह (Samarth Vijay Sinh) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला त्याच्या केवायसी तपशीलांद्वारे कंपनीच्या खात्याशी जोडलेल्या त्याच्या बँक खात्यातून फसव्या व्यवहारांना पास होण्यासाठी कमिशन मिळाले होते.

फेसबुकवरील जाहिरातीस भुलून गुंतवणूक

आपली तब्बल 17.4 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करत 49 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने 19 एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीच्या आधारे सायबर पोलीस एफआयआर दाखल करुन तपास करत आहेत. आरोपींनी ऑनलाईन शेअर ट्रेंडिंगसाठी फेसबुकवर जाहिरात केली होती. ज्याला तक्रारदाराने प्रतिसाद दिला होता. त्याच्या प्रतिसादानंतर आरोपींनी त्याला गोल्डमन स्टॉक कंपास नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केले. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागींनी शेअर बाजारातील घडामोडींवर चर्चा केली. त्यांच्या कथित नफ्याचे स्क्रीनशॉट शेअर केले. (हेही वाचा, Share Market Fraud Pune: बनावट शेअर ट्रेडिंग रॅकेट प्रकरण, पुणे पोलिसांकडून 5 जणांना अटक; आरोपांचे धागेदोरे हाँकाँगपर्यंत)

बोगस ॲप डाउनलोड करुन फसवणूक

तक्रारदाराची शेअर बाजारात असलेली रुची विचारात घेऊन आरोपींनी त्याला GSIN नावाचे ॲप डाउनलोड करण्याचे निर्देश दिले. त्याने Aap वर त्याच्या नावाचे एक आभासी खाते उघडून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तसेच, गुंतवणुकीसाठी त्याच्या मित्रांकडून पैसे जमा केले. आरोपींनी दिलेल्या 12 बँक खात्यांमध्ये त्याने 17.4 लाख रुपये ट्रान्सफर केले. जरी त्याच्या व्हर्च्युअल खात्याने त्याची गुंतवणूक 40 लाख रुपयांपर्यंत वाढल्याचे दाखवले असले तरी, तो कोणताही निधी काढू शकला नाही आणि शेवटी त्याचे खातेही हटविण्यात आले. त्यामुळे भेदरलेल्या पीडिताने पोलिसांची मदत मागितली आणि तक्रार दाखल केली. (हेही वाचा, Share Market Fraud: बोगस शेअर मार्केट कंपनीचा पर्दाफाश, वडोदरा येथे 17 जणांना अटक; गुजरात पोलिसांची कारवाई)

केवायसी कागदपत्रांमुळे धागेदोरे सापडले

दरम्यान, एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली. सायबर पोलिसांनी एका कंपनीचे बँक खाते शोधून काढले, ज्याचे तपशील आरोपीच्या केवायसी कागदपत्रांशी जोडले जात होते. पुढील तपासात असे दिसून आले की, या खात्याचा वापर अन्य तीन प्रकरणांमध्येही करण्यात आला असून, त्यातून एकूण 1 कोटी रुपये उकळले गेले.

आणखी एका वेगळ्या प्रकरणात, पोलिसांनी उदय सिंग (46) आणि संजय वर्मा (34) यांना जयपूरमधून अर्धवेळ नोकरीच्या फसवणुकीसाठी अटक केली. त्यांनी कथितरित्या पीडितेला टास्क जॉबमध्ये गुंतवण्यास प्रलोभित केले. जसे की ब्रँडसाठी पुनरावलोकने देणे. परिणामी तक्रारदाराचे 18.31 लाखांचे नुकसान झाले. तपासामध्ये आढळून आले की, ही सर्व रक्कम शेल कंपनीच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. या प्रकरणातही दोन संशयितांना अटक करण्यात आली.