Onion Price Rise: कांद्याच्या किमतीत वाढ, ग्राहकांचे हाल; कसे आहेत दर? जाणून घ्या
देशभरातील बाजारपेठांमध्ये भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचे भाव 40 ते 60 रुपये किलोवरून 70 ते 80 रुपये किलो झाले आहेत.
Onion Price Rise: कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले (Onion Price Hike) आहे. देशभरातील बाजारपेठांमध्ये भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचे भाव 40 ते 60 रुपये किलोवरून 70 ते 80 रुपये किलो झाले आहेत. दिल्लीतील बाजारातील एका विक्रेत्याने एएनआयशी बोलताना सांगितले की, 'कांद्याची किंमत 60 रुपयांवरून 70 रुपये किलोपर्यंत वाढली आहे. किमतीत वाढ झाल्यामुळे विक्रीत घट झाली आहे. परंतु लोक अजूनही कांजा खरेदी करत आहेत. कारण कांदा खाण्याच्या सवयींचा एक महत्त्वाचा भाग आहे.' (Wada Police Seize Rs 3.70 Crore: पालघर जिल्ह्यात 3.70 कोटी रुपयांची रोकड जप्त; वाडा पोलिसांची कारवाई)
फैजा या खरेदीदाराने कांद्याच्या दरवाढीबद्दल तिची व्यथा सांगितली आणि म्हणाली, 'कांद्याचे भाव हंगामानुसार कमी व्हायला हवे होते. तरीही वाढले आहेत. 70 रुपये किलोने कांदा खरेदी जात आहे. त्याचा सर्वसामान्यांच्या आहारावर परिणाम झाला आहे. 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत दिल्लीत कांद्याची किंमत 80 रुपये प्रति किलोग्रॅम होती. मुंबईसह देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.
मुंबईतील खरेदीदार डॉ. खान यांनी एएनआयशी यांनी किमती वाढण्याबाबत बोलताना सांगितले की, 'कांदे आणि लसणाच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. ते दुपटीने वाढले आहेत. याचा परिणाम घरच्या बजेटवरही झाला आहे. यासाठी मी 5 किलो कांदा खरेदी केला 360 रुपयांमध्ये." आकाश या खरेदीदाराने सांगितले की, 'कांद्याचे भाव वाढले आहेत. कांद्याचे भाव 40-60 रुपये किलोवरून 70-80 रुपये किलो झाले आहेत.