Thane: दिव्यामध्ये इमारतीवर वीज कोसळून एकाचा मृत्यू, गणेश नगर परिसरात घडली घटना

अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, ही घटना बुधवारी रात्री 8 च्या सुमारास घडली जेव्हा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस (Rain) पडत होता.

Lightning | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) ठाणे (Thane) जिल्ह्यात एका निवासी इमारतीवर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, ही घटना बुधवारी रात्री 8 च्या सुमारास घडली जेव्हा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस (Rain) पडत होता. ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal corporation) प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (Regional Disaster Management Room) प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की, दिवा (Diva) शहरातील गणेश नगर परिसरात एका इमारतीवर वीज कोसळल्याने प्रभाकर गोविंद आंब्रे गंभीर भाजले आहेत.

आंब्रे यांना छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याआधी नुकतीच मध्य प्रदेशातील लोद गावात वीज पडल्याने दोन जण ठार झाले आणि इतर दोघे जखमी झाले, तर जीरान गावात वीज पडून राजस्थानमधील एका माणसासह दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

दरम्यान भारताच्या हवामान खात्याने (IMD) संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, दक्षिण -पश्चिम मान्सूनच्या गेल्या तीन महिन्यांत अत्यंत हवामानाच्या घटनांमुळे देशात एकूण 435 लोकांचा मृत्यू झाला आहे . त्यापैकी विजेच्या धक्क्याने 240 लोकांचा बळी गेला, जो एकूण मृतांच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असे आकडेवारी सांगते. हेही वाचा Crop Loss: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा; गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी 122.26 कोटी मदत निधी मंजूर 

यावर्षी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम राजीवन यांच्यासह वरिष्ठ हवामान तज्ञांनी प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, 1970 ते 2019 या 50 वर्षांच्या कालावधीत तब्बल 7,063 हवामानाच्या घटनांमध्ये 1,41,308 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1971-2019 पर्यंत देशात वीज पडून 8,862 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.