चंद्रपूर मध्ये वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; शरीरापासून डोकं वेगळं झाल्याच्या अवस्थेत सापडला मृतदेह
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी मुंबईत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असून येत्या 1-2 दिवसांमध्ये तनपुरे बैठक घेणार असल्याचेही समोर आले आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर (Chandrapur) वीज केंद्र परिसरात वाघाच्या दहशतीने सध्या स्थानिक भयभीत आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार काल रात्री 10.45 च्या सुमारास भोजराज मेश्राम या कामगारावर वाघाने हल्ला केला आहे. आज सकाळी या कामगाराचा विचित्र अवस्थेमध्ये मृतदेह आढळला आहे. या हल्ल्यात भोजराच्या शरीरापासून त्याचं डोकं वेगळं करण्यात आलं आहे.
वीज केंद्र परिसरामध्ये वाघ फिरत होता त्याची माहिती वन खात्याला दिली होती. मात्र वन खात्याकडून बंदोबस्ताचं काम होण्यापूर्वीच वाघाने एका कामगारावर जबर हल्ला केल्याची बाब समोर आली आहे. त्याची सायकल रस्त्यावर पडलेली दिसली. हा कामगार सीटीपीएस मधील कुणाल एंटरप्राईजेस या कंपनीचा होता. नक्की वाचा: चंद्रपूर जंगलात वाघाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू तर अस्वल हल्ल्यात दोनजण जखमी .
काही दिवसांपूर्वी वीज केंद्रामधून एका 5 वर्षीय मुलीला वाघाने उचलले होते, त्याचा मृतदेह मिळाला. अशीच एक घटना हिराई विश्रामगृहाजवळ देखील घडली होती. वाघाच्या हल्ल्यात बळी गेल्याची आता ही तिसरी घटना आहे.