Mumbai ‘Spa’ Murder Case: चुलबुल पांडे यांच्या हत्या प्रकरणी एकाला अटक, वरळीतील घटना

गुरुवारी पोलिसानी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

Representative Image (Photo Credits- Pixabay)

Mumbai ‘Spa’ Murder Case: मुंबईतील वरळी (Worli) परिसरात एका 'स्पा सेंटर'मध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ( 26 ) अटक केले आहे. गुरुवारी पोलिसानी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत व्यक्तीचे नाव गुरु वाघमारे उर्फ चुलबुल पांडे होते. त्याच्या नावाखाली अनेक गुन्ह्यांची नोंद होती. दुसऱ्या आरोपीला शोधण्याचे प्रयत्न सुरु आहे. (हेही वाचा- गर्लफ्रेडच्या उपस्थित गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पोलिसांचा तपास सुरु)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना हत्येची माहिती मिळताच, आरोपीला शोधण्यासाठी पथक तयार केली आणि काही तासांच्या आत आरोपीला अटक केले. आरोपीला पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथून अटक केले. पोलिसांनी सांगितले की, गुरु उर्फ चुलबुल याची बुधवारी मध्यरात्रीच्या वेळीस 'स्पा स्टेंटर'मध्ये दोन अज्ञात आरोपींनी हत्या केली. चाकूने अंगावर वार केले. त्याच्या अंगावर अनेक जखमा होत्या.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “अटक करण्यात आलेली व्यक्ती गुरु वाघमारेची हत्या करणाऱ्या दोन आरोपींपैकी एक आहे. सुपारी घेऊन हत्या केल्याचे समोर आले.” प्रकरणातील तपशीलानुसार, मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारा वाघमारे हा वरळी नाका येथे असलेल्या ‘स्पा’मध्ये नियमित जात असे आणि तेथील काम करणाऱ्या लोकांशी त्याची ओळख होती. हत्या करण्याच्या वेळीस त्याची गर्लफ्रेंड स्पा सेंटरमध्ये उपस्थित होती. त्यामुळे पोलिसांनी तीला देखील ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु आहे.