Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, आदी नेत्यांनी ट्विटरवर केले विनम्र अभिवादन
फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘आमचे मार्गदर्शक’ असा केला आहे.
Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती साजरी होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, आदी नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विनम्र अभिवादन केलं आहे. लोकांच्या कल्याणासाठी बाळासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. त्यांचा आदर्श आजही कायम आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. तसेच शिवसेना आणि भाजपमधील टीकेचं राजकारण सुरू असताना आज देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं ट्विट सर्वत्र चर्चेचा विषय ठरलं आहे. फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘आमचे मार्गदर्शक’ असा केला आहे. (वाचा - बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण; शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट -
देवेंद्र फडणवीस ट्विट -
अजित पवार ट्विट -
अनिल देशमुख ट्विट -
सुप्रिया सुळे -
धनंजय मुंडे ट्विट -
दरम्यान, आज मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकापर्ण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.