National Science Day चे औचित्य साधून BMC ने दिली कोरोनाविरुद्धच्या सुरक्षेच्या '3 केमिकल' ची माहिती
हे तीन केमिकले एका चित्राच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना सांगितले आहे.
देशाचे महान वैज्ञानिक शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी भौतिक विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. म्हणून हा दिवस देशात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दिवस' (National Science Day) म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेने (BMC) ट्विटच्या माध्यमातून कोरोना विरुद्ध लढण्याचा एक अनोख्या पद्धतीने मूलमंत्र सांगितला आहे. यामध्ये सुरक्षेच्या '3 केमिकल' (3 Chemicals) ची माहिती देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सुरक्षेचे '3 केमिकल' मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. हे तीन केमिकले एका चित्राच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना सांगितले आहे.हेदेखील वाचा- Curfew in Hingoli: हिंगोलीत उद्यापासून सलग सात दिवस संचारबंदी
या चित्रात मिशन झिरो हे मुख्य केमिकल असून त्यात अंतर राखा, हात धुवा आणि मास्क लावा हे तीन केमिकल असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील एकही केमिकल कधीही विसरू नका असेही BMC ने सांगितले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 8623 रुग्ण आढळले असून 51 जणांचा बळी गेला आहे.
यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 21 लाख 46 हजार 777 इतकी आहे. तर मृतांचा एकूण आकडा 52,092 वर पोहोचला आहे. सद्य घडीला राज्यात 20 लाख 20 हजार 951 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.
तर मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मुंबईत काल 987 रुग्णांची भर पडली आहे. तर, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 24 हजार 864 इतकी झाली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 11 हजार 465 इतका झाला आहे.