FDA कडून Zepto ने अन्न सुरक्षेशी संबंधित उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई वर निवेदन जारी

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही तपासणी करण्यात आली आहे.

Zepto | X@ANI

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA) कडून काही दिवसांपूर्वी झालेल्या तपासणीदरम्यान त्यांच्या धारावी स्टोरेज सुविधेत गंभीर स्वच्छताविषयक त्रुटी आढळल्यानंतर Zepto वर कारवाई करण्यात आली होती. या कारवाई नंतर आता पहिल्यांदाच Zepto कडून एक अधिकृत निवेदन करण्यात आलं आहे. या वर झेप्टोच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही अंतर्गत आढावा सुरू केला आहे आणि पूर्ण आणि जलद अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू आहेत."

अन्न सुरक्षेशी संबंधित उल्लंघन, एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या पदार्थांचा साठा आणि अयोग्य साठवणुकीच्या परिस्थितीचा उल्लेख करून Zepto ची मूळ कंपनी असलेल्या Kiranakart Technologies चा food business license यापूर्वीच एफडीएने निलंबित केला होता. अधिकाऱ्यांकडून compliance approval मिळेपर्यंत हे निलंबन कायम आहे.

Zepto ला एफडीए ची नोटीस

आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) अनुपमा बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाचे नेतृत्व करण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement