Mumbai news: सायन रेल्वे स्थानकावर चापट मारल्यामुळे प्रवाशी रेल्वे रुळावर पडला, काही क्षणातच होत्याचं नव्हत झालं

या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Indian Railways | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Mumbai News: सायन रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे स्थानकावर दोन व्यक्तीमध्ये मारामारी चालू होती दरम्यान एका व्यक्तीने थप्पड मारल्यामुळे जोरात धक्का लागला तो व्यक्ती थेट रेल्वेच्या रुळावर येवून पडला. दरम्यान दुर्देवाने लोकल ट्रेनचा पीडीत व्यक्तीला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक  घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना १३ ऑगस्ट रोजी सायन स्टेशनवर घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शीतल माने (30) आणि तिचा पती अविनाश (35) रविवारी रात्री 9.15 च्या सुमारास मानखुर्दला जाण्यासाठी सायन स्टेशनवर आले. सायन प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असताना एका व्यक्तीने शीतलला धक्काबुक्की केली.धक्काबुकी केल्यामुळे शीतलला राग आला आणि तिने त्या व्यक्तीवर छत्रीने वार करून बदला घेतला. शीतल सोबत  कोणीतरी बाचाबाची करत आहे .हे तिचा पती अविनाश याच्या लक्षात आले तेव्हा तो पटकन जवळ गेला. जाब विचारण्यासाठी अविनाशने त्या व्यक्तीला जोरदार धक्का दिला, आणि एक कानाखाली मारली ज्यामुळे ती व्यक्ती रेल्वे रुळावर येवून पडला.

धावती लोकल ट्रेन जवळ येत असताना त्या माणसाने पटकन उठून पुन्हा प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाने सर्वतोपरी प्रयत्न केले पण ट्रेन त्याच्याजवळ आल्याने तो प्लॅटफॉर्मवर परत येऊ शकला नाही. ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये तो अडकला आणि शेवटी ट्रेनखाली चिरडला गेला. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

सुरुवातीला दादर जीआरपीने या घटनेसाठी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवला होता. मात्र, जीआरपी गुन्हे शाखेने अधिक तपास केला असता, मृत व्यक्तीचे नाव दिनेश राठोड (२६) असल्याचे समोर आले, तो बेस्टमध्ये कामाला होता. सायन स्टेशनच्या सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे अविनाशने मारल्याच्या परिणामी राठोड ट्रॅकवर पडला होता.चौकशी केल्यानंतर गुन्हे शाखेने अविनाश माने आणि शीतल यांना अटक केली, त्यानंतर त्यांना दादर जीआरपीच्या ताब्यात दिले.