BMC On Omicron: मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना होम क्वारंटाईन, आरटी-पीसीआर सक्तीचे करावे लागेल- मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना
दुंबई (Dubai) आणि इतर देशांतून आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणारे प्रवासी, जे मुंबईचे रहिवासी आहे त्यांना 7 दिवसांचे होम क्वारंटाईन (Home Quarantine) आणि आरटीपीसीआर (RT-PCR ) चाचणी सक्तीची करावी लागेल असे, मुंबई महापालिकेने (BMC On Omicron) म्हटले आहे.
दुंबई (Dubai) आणि इतर देशांतून आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणारे प्रवासी, जे मुंबईचे रहिवासी आहे त्यांना 7 दिवसांचे होम क्वारंटाईन (Home Quarantine) आणि आरटीपीसीआर (RT-PCR ) चाचणी सक्तीची करावी लागेल असे, मुंबई महापालिकेने (BMC On Omicron) म्हटले आहे. तसेच, मुंबई वगळता महाराष्ट्रातील इतर भागात आंतरराष्ट्रीय प्रवास करुन दाखल होणाऱ्या प्रवासी अथवा नागरिक यांना सार्वजनिक वाहतूक करण्यास परवानगी असणार नाही. या लोकांसाठी वाहतूकीसाठी वाहनांची स्वतंत्र व्यवस्था केली जा जाईल अशी माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली आहे.
दुबई आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करुन मुंबईत दाखल होणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एका पत्रकाद्वारे जारी केलेल्या या सूचनांमध्ये मुंबई माहापालिकेने म्हटले आहे की, SARS-CoV-2 व्हेरीएंट ज्याला ओमायक्रोन नावाने ओळखले जाते. हा व्हेरीएंट जगभरातील अनेक देशांमधून आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशांमुळे मोठ्या प्रमाणावर संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार काही मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल असे महापालिकेने म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus Pandemic Update: जगासमोर Omicron नंतर Delmicron स्ट्रेनचा धोका, कोविड-19 महामारीने वाढवली नवी चिंता )
- आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेले प्रवासी आणि मुंबईतील रहीवासी यांना 7 दिवस होम क्वारंटाईन केले जाईल. या प्रवाशांनी मुंबईत दाखल होताच स्वत:ची आरटी पीसीआर चाचणी करुन घ्यायला हवी.
- जे प्रवासी महाराष्ट्रातील इतर भागात आंतरराष्ट्रीय प्रवास करुन जातील त्यांना सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करता येणार नाही. त्यांच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांद्वारा प्रवास आणि वाहतुकीची स्वतंत्र्य व्यवस्था केली जाईल.
- जे प्रवासी दुबई आणि ओमायक्रोनचा प्रभाव अधिक असलेल्या देशांतून मुंबई अथवा महाराष्ट्रात दाखल झाले आहेत ते आंतरराज्य प्रवासासाठी विमानसेवा वापरु शकतात. मात्र, त्यांनी त्याबाबत संबंधित विमानतळ प्रशासनाला माहिती द्यावी. त्यांच्या परवानगीनेच हा प्रवास करता येईल.
ट्विट
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरस महामारीत (Coronavirus Pandemic) चिंतेचा विषय ठरली आहे. या चिंतेतून जग काहीसे सावरत असतानाच सुरुवातील 'डेल्टा' आणि त्यानंतर ओमायक्रोन (Omicron) हा कोविडचा नवाच स्ट्रेन पुढे आला. ओमायक्रोन स्ट्रेनच्या धोक्यातून सावरण्याठी जग वाट काढत असतानाच आता ‘डेल्मिक्रॉन’ (Delmicron) नावाचं सावट आले आहे. दरम्यान, ओमायक्रोन व्हायरस जगभरातील विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र सरकारने विविध राज्यांना खबरदारी घेण्यास बजावले आहे. त्यामुळे सन 2022 मध्येही जगाला कोरोनापासून मुक्ती मिळण्याची चिन्हे काहीशी कमीच आहेत.