Om Purity Certificate For Hindu Traders: मुंबईच्या ओम प्रतिष्ठानचा हिंदू व्यापाऱ्यांसाठी 'ओम शुद्धता प्रमाणपत्र' देण्याचा उपक्रम; FDA ने स्पष्ट केली आपली भूमिका

मुंबईतील दादर पश्चिम येथील शिवसेना भवन मार्गावरील कमल कुंज येथून कार्यरत असलेल्या ओम प्रतिष्ठानने, 'हिंदू से हिंदू' या संकल्पनेवर आधारित हिंदू व्यापाऱ्यांना 'ओम शुद्धता प्रमाणपत्र' देण्याची योजना जाहीर केली आहे.

Om Purity Certificate For Hindu Traders

मुंबईस्थित ओम प्रतिष्ठानने (Om Pratishthan) हिंदू व्यापाऱ्यांसाठी 'ओम शुद्धता प्रमाणपत्र' (Om Purity Certificate) जारी करण्याचा एक उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे हिंदूंच्या व्यवसायवृद्धीसाठी दुकानदार, सेवा पुरवठादार, उत्पादक अशा सर्वांसाठी ओम प्रमाणपत्र देण्यात येत आहे. परंतु अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) स्पष्ट केले आहे की, कोणत्याही खाजगी संस्थेला अशी प्रमाणपत्रे वितरित करण्याचा अधिकार नाही. या संदर्भात काही तक्रार असल्यास व्यापाऱ्यांना एफडीए किंवा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील दादर पश्चिम येथील शिवसेना भवन मार्गावरील कमल कुंज येथून कार्यरत असलेल्या ओम प्रतिष्ठानने, 'हिंदू से हिंदू' या संकल्पनेवर आधारित हिंदू व्यापाऱ्यांना 'ओम शुद्धता प्रमाणपत्र' देण्याची योजना जाहीर केली आहे. या प्रमाणपत्राद्वारे ग्राहकांना खात्री दिली जाईल की, त्यांच्या परिसरातील दुकानदार हिंदू आहेत. त्यानंतर, ग्राहक क्यूआर कोड स्कॅन करून दुकानाची ओळख पडताळू शकतात. स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे या संस्थेचे नेतृत्व करतात.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करून, ओम प्रतिष्ठान त्यांच्या उपक्रमाला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, संघटनेवर हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये तणाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की अशा प्रमाणपत्रांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भेदभाव वाढेल आणि सामाजिक सौहार्द बिघडेल. एफडीएने या उपक्रमाला स्पष्ट विरोध दर्शविला आहे.

एफडीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणतीही खाजगी संस्था अन्न किंवा व्यापाराच्या शुद्धतेबाबत प्रमाणपत्रे देऊ शकत नाही. अशा प्रमाणपत्रांचे वितरण बेकायदेशीर आहे. जर व्यापाऱ्यांवर अशी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी दबाव आणला जात असेल किंवा त्रास दिला जात असेल, तर प्रशासनाने स्थानिक पोलीस स्टेशन किंवा एफडीए कार्यालयात त्वरित तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमावर टीका केली आहे आणि म्हटले आहे की, अशा योजनांमुळे समुदायांमध्ये अविश्वास आणि शत्रुत्व वाढेल. (हेही वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल WhatsApp Group वर आक्षेपार्ह टीप्पणी केल्यावरून एका व्यक्तीला मारहाण; पोलिसांनी केली अटक)

ओम प्रतिष्ठानने त्यांच्या वेबसाइट आणि प्रचार साहित्यात म्हटले आहे की, हे प्रमाणपत्र हिंदू भाविकांना शुद्ध प्रसाद आणि पूजा साहित्य पुरवण्यासाठी आहे. हे प्रमाणपत्र घेणे ऐच्छिक आहे आणि कोणावरही सक्ती नाही. तसेच, यामुळे हिंदू व्यापाऱ्यांचा आर्थिक विकास आणि सक्षमीकरण होईल असा दावा संघटनेने केला आहे. संस्थेने नमूद केले आहे, ‘आपल्याला थूक, फूक विरहित पूजा साहित्य, खाद्यपदार्थ मिळावे यासाठी आपण हिंदूंकडूनच आणि त्यातही ओम प्रमाणित दुकानातूनच खरेदी करणे, ओम प्रमाणित सेवा पुरवठादाराकडूनच आणि उत्पादकाकडूनच सेवा घेणे तसेच आवश्यक सर्व उत्पादन घेणे हे आपल्याच व्यवसाय वृद्धीसाठी अत्यावश्यक झाले आहे.’

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement