Raj Thackeray यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या तरुणाला मनसैनिकांचा दणका, व्हिडिओ व्हायरल

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सोशल मीडियावरील अधिकृत पेजवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या पुण्यातील एका तरुणाला मनसैनिकांनी दणका दिला आहे.

RajThackeray (File Photo)

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सोशल मीडियावरील अधिकृत पेजवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या पुण्यातील एका तरुणाला मनसैनिकांनी दणका दिला आहे. या तरुणाला मनसैनिकांनी 50 उठाबश्या काढण्याची अद्दल घडवली असून जाहीर माफी मागण्यास भाग पाडले आहे. तसेच या पुढे कोणीही अशी आक्षेपार्ह टीका राज ठाकरे यांच्यावर केल्यास या पद्धतीची शिक्षा त्या व्यक्तीला देण्यात येईल असा इशारा मनसैनिकांकडून देण्यात आाला आहे.

पुण्यामध्ये राहणाऱ्या एका तरुणाने राज ठाकरे यांच्या अधिकृत पेजवर आक्षेपार्ह टीका केली. यानंतर संतप्त झालेल्या मनसैनिकांनी या तरुणाचा शोध घेत त्याच्या घरी जाऊन धडकले. त्यावेळी मनसैनिकांनी त्याच्या घरची परिस्थिती पाहता त्याला मारहण केली नाही. तर केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून त्याला 50 उठाबश्या काढण्यात सांगितल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- मोदींच्या मुलाखतीवर राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून फटकारे)

त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांवर अशाच पद्धतीची शिक्षा देण्यात येणार असल्याचे मनसैनिकांनी सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif