शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या माळी, ओबीसी, समाजातील बांधवाच्या पाठीशी खंबीर उभा राहणार - अनिल महाजन

शासकीय सेवेत पदोन्नती मध्ये ओबीसी आरक्षणाचा लाभ आमच्या लोकांना मिळत नाही आहे त्यासाठी ही महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत अशी माहिती ओबीसी नेते, प्रदेश अध्यक्ष-महाराष्ट्र माळी समाज महासंघ अनिल महाजन यांनी दिली आहे.

Anil Mahajan (Photo Credits: File Photo)

माळी समाजातील शासकीय कर्मचारी यांच्या वर अनेक ठिकाणी अन्याय होताना दिसतो. सरकारी कर्मचारी असल्या मुळे स्वतःवर होणाऱ्या अन्याय बाबत आवाज उचलता येत नाही. अनेक ठिकाणी राजकीय दबावाखाली अनेक अधिकारी, राजकीय पुढारी, माळी समाजाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नेहमी अन्याय करतात. या शासकीय कर्मचारी यांना ना आंदोलन करता येते ना, कुठे तक्रार करता येते .आपले शिक्षण व स्वतःचे कौशल्य पणाला लावून व रात्र-दिवस अभ्यास करून या समाज बांधावानी पदवी मिळवल्या आहेत. शासकीय कोणत्या ही खात्यात असो ! काही जातीय वादी लोकांकडून यांच्यावर नेहमी अन्याय होतांना दिसत आहे.राज्यात असें अनेक उदाहरणे आहेत. तसेच शासकीय सेवेत पदोन्नती मध्ये ओबीसी आरक्षणाचा लाभ आमच्या लोकांना मिळत नाही आहे त्यासाठी ही महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत अशी माहिती ओबीसी नेते, प्रदेश अध्यक्ष-महाराष्ट्र माळी समाज महासंघ अनिल महाजन यांनी दिली आहे.

शिपाई,लिपिक ते क्लासवन अधिकारी पर्यंत तालुका कार्यलय पासून ते थेट मंत्रालय पर्यत माळी/ ओबीसी समाजातील लोक शासकीय सेवेत आहेत.पोलीस विभाग,महसूल विभाग असो किंवा मंत्रालयीन कर्मचारी असो किंवा न्यायालयीन विभागात असो सर्व प्रकारच्या शासकीय कार्यलायात सर्व ठिकाणी आपल्या मेहनतीवर हे लोक कार्यरत आहेत. राज्यभर समाज संघटन करतांना अनेक घटना कानावर येत आहेत. यासाठी समाजाचा एक घटक म्हणून व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने समाज बांधवांचा प्रतिनिधी म्हणून या सर्व शासकीय सेवेत असलेले कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे ! राज्यभर कार्यरत असलेली महाराष्ट्र माळी समाज महासंघ अशा पीडित लोकांना मदत करणार आहे. कुठला राजकीय पक्ष किंवा पुढारी यांना मदतीला येईल किंवा नाही हे माहीत नाही पण माझ्या समाज बाधवांचा मदतीला मी उभा रहाणार व आमचे संघटन यांच्या साठी सनदशीर मार्गाने न्याय मिळून देण्यासाठी यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा रहाणार.

काही प्रस्थापित घटकांकडून माळी / ओबीसी समाजातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या समाज बांधवांवर जातीभेदा मुळे अनेक ठिकाणी अन्याय होत आहे. उदा,नियमानुसार बदली असो किंवा पदोन्नती व इतर अशा अनेक विषयामध्ये काही वरिष्ठ अधिकारी व प्रस्थापित लोक यांच्यावर अन्याय करत आहेत. यापुढे राज्यात असे खपवून घेतले जाणार नाही. महाराष्ट्र माळी समाज महासंघ समाज बांधवांना सदनशीर मार्गाने न्याय मिळवून देईल व यांच्या पाठीशी खंबीर उभा रहाणार.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif