किर्तनकार इंदुरीकर महाराजांना संगमनेर येथील वैद्यकीय विभागाकडून नोटीस
अशातचं आता त्यांच्या अडचणीत आखणी वाढ झाली आहे. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर येथील वैद्यकीय विभागाकडून नोटीस काढण्यात आली आहे.
किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी गर्भलिंग चाचणी संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी गेल्या आठवड्यापासून जोर धरत आहे. अशातचं आता त्यांच्या अडचणीत आखणी वाढ झाली आहे. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर येथील वैद्यकीय विभागाकडून (Medical Department) नोटीस (Notice) बजावण्यात आली आहे. संगमनेरमधील वैद्यकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी इंदुरीकर महाराजांच्या घरी जाऊन ही नोटीस दिली असल्याचं समजतयं. तसेच प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार, (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act, 1994) गर्भलिंग चाचणी हा कायद्यान्वये गुन्हा आहे. त्यामुळे सरकारच्या पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीनेदेखील इंदुरीकर महाराजांविरोधात नोटीस बजावली आहे.
इंदुरीकर महाराजांनी आपल्या एका किर्तनामध्ये लोकांना गर्भलिंगाविषयीचा 'ऑड-इव्हन फॉर्म्युला' सांगितला होता. 'सम संख्येला संग केल्यास मुलगा जन्माला येईल. तर विषम तारखेला संबंध आल्यास मुलगी जन्माला येईल,' असं इंदोरीकरांनी आपल्या किर्तनात म्हटलं होतं. (हेही वाचा - किर्तनकार इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार? गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन' फॉर्म्युल्यासंदर्भात केलं 'हे' वादग्रस्त विधान)
इंदोरीकर यांनी गर्भलिंग निदानासंदर्भात जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, इंदोरीकर यांच्याविरोधाच अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनीदेखील इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गर्भलिंग चाचणी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.