मालाड रेल्वेस्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून बंद, प्रवाशांची गैरसोय होणार

मालाड (Malad) येथील दोन ते तीन पादचारी पूल आजपासून (5 एप्रिल) बंद ठेवण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सीएसएमटी (CSMT) येथील हिमालय पादचारी पूल पडल्याच्या दुर्घटनेनंतर आता पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील पूलाचे बांधकाम करण्यास महापालिकेकडून सुरुवात झाली आहे. तर मालाड (Malad) येथील दोन ते तीन पादचारी पूल आजपासून (5 एप्रिल) बंद ठेवण्यात येणार आहे.

दुरुस्तीच्या कामासाठी हे पूल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन दिली आहे. तसेच पुढील काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मात्र रेल्वेप्रशासनाने प्रवाशांसाठी येण्याजाण्यासाठी योग्य ते नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहेत.(हेही वाचा-कुर्ला रेल्वेस्थानकातील पाचदारी पुल दुरुस्तीच्या कारणामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून काही दिवस बंद)

मुंबई पोलीस ट्वीट:

तसेच यापूर्वी सुद्धा मालाड रेल्वे स्थानकातील उत्तर दिशेला असणारा पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तर पूल पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन 29 मार्च ते 28 जून पर्यंत या पूलाच्या दुरुस्तीचे काम सुरु राहणार असल्याची माहिती दिली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif