Dress Code For Govt Employees in Maharashtra: सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेसकोड लागू; शासकीय कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत? घ्या जाणून
तसेच महिला कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांनाही (Maharashtra Govt Employees) ड्रेस कोड (Dress Code) लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने (Maharashtra Government) जाहीर केले आहे. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थीत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते. यामुळे यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यलयात जीन्स आणि टी- शर्ट घालता येणार नाही. तसेच महिला कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते नाही यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारकडून ड्रेसकोडबाबत नवे नियम ठरवले आहेत.हे देखील वाचा- Maha Vikas Aghadi: संजय राऊत यांच्या 'या' वक्तव्यावरून महाआघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता
काय आहेत ड्रेसकोडचे नवे नियम-
- सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये जीन्स टी-शर्ट किंवा गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करता येणार नाही.
- आठवड्यातून एकदा म्हणजेच शुक्रवारी खादी कपड्याचा पेहराव करावा लागणार आहे.
- कार्यालयामध्ये स्लिपर वापरणे बंधनकारक असणार आहे.
- दरम्यान, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये शक्यतो सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा लागणार आहे.
- सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला कर्मचार्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा.
- परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.
शासकीय कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. अशा परिस्थितीत जर अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावर देखील होतो. या सर्व गोष्टींचा विचार करता मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.