देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) धुमाकूळ घातला आहे. राज्यावर कोरोनाचे संकट असताना विरोधीपक्षातील नेते सत्ताधाऱ्यांनावर टीका करू लागले आहेत.

Union minister Nitin Gadkari (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) धुमाकूळ घातला आहे. राज्यावर कोरोनाचे संकट असताना विरोधीपक्षातील नेते सत्ताधाऱ्यांनावर टीका करू लागले आहेत. यातच केद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाजप पक्षातील नेत्यांची अप्रत्यक्षरित्या कान उघडणी केली आहे. राजकारणापेक्षा विकासकारण आणि राष्ट्रकारण महत्त्वाचे आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. सगळ्या पक्षाच्या संवेदनशील नेत्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. देश संकटात असताना आम्ही सगळे एक आहोत, ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच एखादा मुद्दा पटला नसेल तर, त्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा. सध्याची वेळ ही एकजुटीने कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची आहे. सध्या देश कोरोनाच्या संकटाशी लढतोय. हे संकट हे देशावरचे सगळ्यात मोठे संकट आहे. या संकटात राजकारण करणे गैर आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातील नागरिकांना आपल्या राज्यात परतण्यासाठी विशष रेल्वेची व्यवस्था करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. यावर नितीन गडकरी म्हणाले की, या कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे. नागपूरमधील औद्योगिक वसाहतील कंपन्यांना कामगारांच्या आरोग्याची काळजी घेऊन काम सुरू करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे महामार्गाची कामही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कामगारांना घरी पोहोचवण्याऐवजी काम देण्याकडे सरकारचा कल आहे, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus In Maharashtra: राज्यात आज 431 नवीन कोरोना विषाणू प्रकरणांची नोंद; एकूण रुग्णांची संख्या 5649 वर

लवकरच भारत कोरोनाविरोधात लढाई जिंकेल-

अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या तुलनेत भारताने कोरोनच्या लढाईत विजय मिळवल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरु झाले आहेत. बंदरे सुरु झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाते आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत आपण बरेच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहेत.

पेट्रोल- डिझेलच्या किंमतीबाबत नितीन गडकरी काय म्हणाले?

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर निचांकी पातळी गेले आहेत. हे खरे आहे. पण, केंद्र सरकार सध्या दर कपात करू शकत नाही. कारण सरकारकडे तेलाचा प्रचंड साठा करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वीच्या दराने विकत घेतलेले पेट्रोल डिझेल सध्या देशात विक्रीसाठी आहे. त्याच्या दरात कपात केली, तर पेट्रोलियम कंपन्यांना दिवाळखोरीतच जावे लागेल. त्यामुळे अशी दर कपात करता येत नाही. आता सध्या आयात केलेल्या तेलाच्या किंमतीविषयी पुढे निर्णय घेतला जाईल, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

करोनाची स्थिती ही गंभीर आहे. मात्र आपण करोनाचा सामना नेटाने करतो आहोत. आपल्या देशाने बरेच नियंत्रण मिळवले आहे. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, कामगारांच्या निवाऱ्याची आणि अन्नाची व्यवस्था करणे, हे नियम पाळून उद्योग, कंपन्या सुरु केल्या तर चालणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करा, असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement